शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातले आदिवासी बनवतात बांबूपासून राख्या

By admin | Updated: August 14, 2016 13:36 IST

बांबूपासून बनवलेल्या राख्या यंदाच्या रक्षाबंधनासाठी बाजारात येत असून त्या मेळघाटसारख्या आदिवासी भागातील गरीबांनी बनवलेल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

बांबूपासून बनवलेल्या राख्या यंदाच्या रक्षाबंधनासाठी बाजारात येत असून त्या मेळघाटसारख्या आदिवासी भागातील गरीबांनी बनवलेल्या आहेत. त्यांना निसर्ग व मानव यांच्यातील बंध या दृष्टीने सृष्टीबंध असे उचित नाव ठेवण्यात आले आहे. या राख्या 25 ते 40 रुपयांमध्ये असून अत्यंत आकर्षक आहेत.मेळघाट म्हटलं की डोळ्यासमोर सातपुड्याच्या पर्वतरांगांमधला कुपोषणासाठी कुप्रसिद्ध भाग असे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र, सृष्टी राखीच्या निमित्तानं या भागातले वंचित आदिवासी काय सादर करू शकतात, त्यांची क्षमता काय आहे आणि त्यांच्याकडे कुठली कौशल्ये आहेत हे समोर येतं.दीबेटरइंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार हे आदिवासी परंपरा जपतात, मानवता राखतात आणि पर्यावरणाचं संवर्धनही करतात असे उद्गार संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक सचिव सुनील देशपांडे यांनी काढले आहेत.मेळघाटमधल्या आदिवासींनी एकत्र यावं आणि वेणू शिल्पी इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह सोसायटी सुरू करावी असा प्रयत्न या संस्थेने केला. अवघ्या पाच दिवसांच्या प्रशिक्षणानं आदिवासींना सुंदर राख्या बनवता यायला लागल्या, त्याही स्थानिक कच्च्या मालातून असे देशपांडे सांगतात.1998 मध्ये अवघ्या 15 आदिवासी कारागिरांसह सुरू झालेल्या या चळवळीत आज 450 कारागिर आहेत, आणि उत्पादनही मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. नैसर्गिक उत्पादनांचा पुनर्निर्मितीत कसा वापर करता येऊ शकेल याचं उत्तम उदाहरण म्हणजे या राख्या होत. शहरात राहणाऱ्या प्रत्येकानं ही राखी घेतली तर ती या आदिवासींसाठी मदत ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. बांबूच्या माध्यमातून या भागातल्या आदिवासींचं जीवनमान बदलू शकतं. मेळघाटातील तवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राकडून या राख्या मागवता येऊ शकतात. अधिक माहितीसाठी  http://bambooshrushti.com/ या संकेत स्थळाला भेट द्यावी.