शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या जन्मदरात आदिवासी आघाडीवर

By admin | Updated: July 31, 2016 04:08 IST

संत तुकाराम महाराजांनी आपल्या या अभंगात कन्येलाच प्रथम मान दिला आहे

कुळी कन्या, पुत्र होती जे सात्त्विक तयाचा हरेक वाटे देवा... 

रमेश पाटील,जळगाव- संत तुकाराम महाराजांनी आपल्या या अभंगात कन्येलाच प्रथम मान दिला आहे... नंतर पुत्राचा उल्लेख आहे... असाच सन्मान जळगाव जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागात मिळाला आहे. रावेर तालुुक्यात एक हजार मुलांमागे तब्बल १५०० मुली जन्माला आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी मुुले व मुलींच्या जन्मदरातील आकडेवारीत प्रचंड तफावत होती. यामध्ये सुधारणा व्हावी याकरिता शासनस्तरातून जनजागृतीसह अनेक प्रयत्न झाले. पाल (ता. रावेर) येथील ग्रामीण रुग्णालयांतर्गत येणाऱ्या आदिवासीबहुल परिसरात मार्च या महिन्यात प्रमाणात १५०० मुलींचा जन्म झाला आहे.>अशी आहे आकडेवारी... रावेर तालुक्यात एकूण तीन ग्रामीण रुग्णालये व सात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यामधील मार्च २०१६ची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. (आकडेवारी प्रती हजार मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या आहे.)पाल ग्रामीण रुग्णालय -१५००, खिरोदा- १०७१, वाघोड- १०००, रावेर ग्रामीण रुग्णालय ९०९, सावदा ग्रामीण रुग्णालय- ८५९ व प्राथमिक आरोग्य केंद्र - ऐनपूर ८५७, चिनावल ९१०, निंभोरा ८०२, थोरगव्हाण ७८९, लोहारा ७७४ असा मुुलींचा जन्मदर असल्याची माहिती रावेर ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. >रावेर तालुक्यातील बराचसा भाग हा आदिवासीबहुल आहे. त्यामुळे या समाजाला सोनोग्राफी आदी चाचण्यांची माहिती नाही. त्यामुळे कन्याजन्माचे प्रमाण वाढले आहे. हे म्हणजे सुशिक्षित समजल्या जाणाऱ्यांच्या डोळ्यात अंजनच आहे.-डॉ. विजया झोपे, वैद्यकीय अधिकारी, रावेर तालुका