शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘बेटी बचाव’मध्ये आदिवासी आघाडीवर !

By admin | Updated: December 26, 2016 05:10 IST

कितीही कडक कायदे केले, तरी स्त्रीभ्रूण हत्येच्या वा तान्हुल्या ‘नकोशी’च्या गळ््याला जन्मदात्यांनीच नख लावल्याचे प्रकार घडतच आहेत.

दिगांबर जवादे / गडचिरोलीकितीही कडक कायदे केले, तरी स्त्रीभ्रूण हत्येच्या वा तान्हुल्या ‘नकोशी’च्या गळ््याला जन्मदात्यांनीच नख लावल्याचे प्रकार घडतच आहेत. मागास समजल्या जाणाऱ्या आदिवासींमध्ये मात्र, याच्या विपरित चित्र पाहायला मिळते. जन्माला येणाऱ्या ‘लक्ष्मी’चे ते मोठ्या उत्साहात स्वागत करतात. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड, चामोर्शी या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये २०१५-१६मध्ये मुलींचा जन्मदर अधिक असल्याचे दिसून आले आहे. मुलींच्या जन्मदराची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. शहरी भागांत मुलींचा जन्मदर प्रत्येकी एक हजार मुलांच्या मागे ९५० ते ९६०च्या दरम्यान आहे. काही समाजांमध्ये तर उपवर मुलाला मुली मिळणे कठीण झाले आहे. भविष्यातील हे धोक्याचे निदर्शक आहे. याच पार्श्वभूमीवर गर्भलिंग चाचणीवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचबरोबर, माध्यम, प्रशासन यांच्या मदतीने शासन जनजागृतीही करीत आहे. तरीही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.मुलींचा जन्मदर ९८० ते ९९०च्या जवळपासजन्माला येणाऱ्या बालकाचे हा आदिवासी आनंदाने स्वागत करतो. गडचिरोलीत मुलींचा जन्मदर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नेहमीच अधिक राहिला आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये १ हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ९८० ते ९९०च्या जवळपास आहे.भामरागड, चामोर्शी व एटापल्ली या तालुक्यांमध्ये तर मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा अधिक आहे. आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २०१५-१६ या वर्षात भामरागड तालुक्यात एक हजार मुलांमागे १ हजार ३९ मुली जन्माला आल्या आहेत. चामोर्शी तालुक्याचा मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे १ हजार ३, तर एटापल्ली तालुक्यात मुलींचा जन्मदर १ हजार २७ एवढा आहे. हे चित्र आशादायी आहे.