शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकासची हुकूमशाही

By admin | Updated: July 19, 2016 03:45 IST

महागाईच्या काळातही मेटाकुटीला येऊन पोषण आहार पुरविणाऱ्या आदिवासी महिला बचत गटांचे कंबरडेच मोडले आहे.

शौकत शेख,

डहाणू- पोषण आहार पुरविण्यासाठी प्रतिविद्यार्थी सर्वात कमी दराच्या म्हणजे ३४५० रुपयांच्या निविदा मंजूर झाल्यानंतरही आदिवासी विकास आयुक्तांनी मनमानीने त्यात ४५१ रुपयांची घट करून प्रतिविद्यार्थी २९९९ रुपयेच मिळतील, असा फतवा काढल्याने महागाईच्या काळातही मेटाकुटीला येऊन पोषण आहार पुरविणाऱ्या आदिवासी महिला बचत गटांचे कंबरडेच मोडले आहे. यावर्षीही सन २०१६-१७ च्या शैक्षणिक वर्षासाठी निवासी वसतीगृहात भोजन पुरविणाऱ्या महिला बचत गटाने प्रति विद्यार्थी ४००० प्रमाणे निविदा भरल्या निविदा उघडल्यानंतर कमीतकमी दर असलेले ३४५० प्रमाणे टेंडर मंजूर झाले. शिवाय ठाणे येथील आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त सुनिल गवादे यांनी ३४५० च्या दराप्रमाणे महिला बचत गटांना लेखी आदेश दिले. त्यामुळे जूनपासून भोजन ठेक्याचे काम सुरू झाले. परंतु नाशिक येथील आदिवासी विकास विभागाचे आयुक्त राजीव जाधव यांनी सध्याच्या महागाईचा कोणताही विचार न करता प्रति विद्यार्थी २९९९ प्रमाणे भोजनाचे दर निश्चित केले. यामुळे हे बचत गट आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी करीत आहेत. डहाणू, तलासरी, पालघर, वसई, इत्यादी तालुक्यात १७ वसतीगृहे असून येथे सुमारे सात हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी वसतीगृहात राहून शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असतात. या आदिवासी विद्यार्थ्यांना दररोज वरण, पोळी, भात, दोन भाज्या, चिकन, दही, सलाड, लोणचे पोटभर जेवण दिले जाते. शासनाच्या नियमाप्रमाणे वसतीगृहात भोजन पुरविण्याचे काम स्थानिक आदिवासी कातकरी महिलांच्या बचत गटांना दिला जातो. त्यामुळे त्यांना रोजगार प्राप्त होऊन ते आर्थिकरित्या सक्षम होत असते. गेल्या वर्षी बचत गटांना प्रति विद्यार्थी ३४५० प्रमाणे बिले अदा करण्यात आली होती. या वर्षी भाजी चिकन, तांदूळ, गव्हाचे दर दुप्पट झाले असतानाही कमी दराच्या आदेशाने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरवर्षी आदिवासी विकास विभाग भोजन ठेक्यासाठी टेंडर मागवतात. परंतु त्याप्रमाणे दर देत नाही. अधिकारी दर निश्चित करून आदिवासी बचत गटांची पिळवणूक करीत असतात. त्यामुळे येथील महिला बचतगट कर्जबाजारी झाले आहेत. सरकार एका बाजूला शहरी व ग्रामीण भागांतील आदिवासी व बिगर आदिवासी महिला बचतगटांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी विविध योजना जाहीर करून निरनिराळया बँकेतून सवलतीच्या दराने कर्जपुरवठा करून प्रोत्साहित करते.शासनाचा एकात्मिक आदिवासी विकास विभाग डहाणू, तलासरी, जव्हार, शहापूर, वसई, पालघर सारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना भोजन पुरविणाऱ्या महिला बचत गटांची पिळवणूक करीत असल्याने जिल्हाभरातील आदिवासी महिला बचत गटांत संताप व्यक्त केला जातो आहे. शासकीय धोरणातील या विरोधाभासाने महिला बचतगट आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.या परस्पर विरोधी आदेशाबाबत पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे आमदार आनंद ठाकूर यांनी लोकमतला सांगितले आहे.