शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी हत्याकांडातील आरोपीचा मेडिकलमध्ये मृत्यू

By admin | Updated: October 23, 2016 15:34 IST

तुमसर येथील बहुचर्चित तिहेरी हत्याकांडातील आरोपीचा मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 23 - तुमसर येथील बहुचर्चित तिहेरी हत्याकांडातील आरोपीचा मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. इमदाद अली वाहिद अली सय्यद (वय ५४) असे मृत कैद्याचे नाव असून तो विविध व्याधींनी त्रस्त होता. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी पोलिसांकडे वर्तविला आहे. इमदाद भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील मातानगरात राहत होता. संशयी आणि सणकी स्वभावाच्या इमदादने २ एप्रिल २०१४ ला सासू, पत्नी आणि स्वत:च्या मुलीची निर्घृण हत्या केली होती. या तिहेरी हत्याकांडाने भंडारा जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडवली होती. भक्कम साक्षीपुराव्याच्या आधारे कोर्टाने इमदादला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.डिसेंबर २०१५ पासून तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होता. त्याला मधूमेह, उच्च रक्तदाब आणि अस्थमाचा आजार जडला होता. त्यामुळे त्याची प्रकृती नेहमीच कमी जास्त होत होती. शुक्रवारी रात्री त्याची प्रकृती खालावल्याने त्याच्यावर कारागृहातील रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती जास्तच बिघडल्याने त्याला कारागृह प्रशासनाने मेडिकलमध्ये भरती केले. तेथील डॉक्टरांनी शुक्रवारी रात्री ११.१५ वाजता इमदादला मृत घोषित केले. कारागृह रक्षक राकेश रामदास वांढरे यांनी दिलेल्या माहितीवरून धंतोलीच्या पोलीस उपनिरीक्षक नम्रता जाधव यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.