शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आरोपपत्र दाखल करण्यास पुणे न्यायालयाने सीबीआयला दिलेली मुदतवाढ बेकायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 05:54 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे दंडाधिकाऱ्यांनी सीबीआयला बेकायदेशीररीत्या ४५ दिवसांची मुदतवाढ दिली

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे दंडाधिकाऱ्यांनी सीबीआयला बेकायदेशीररीत्या ४५ दिवसांची मुदतवाढ दिली, असा आरोप या प्रकरणातील आरोपी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी करत, उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आरोपींवर यूएपीएअंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आल्याने, या सर्वांची केस विशेष न्यायालयाने चालविणे अपेक्षित आहे. मात्र, कोणतेही अधिकार नसताना पुणे दंडाधिकाºयांनी सीबीआयला आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ दिली, असे आरोपींचे म्हणणे आहे.

नोव्हेंबर, २०१८ मध्ये पुण्यातील दंडाधिकाºयांनी सीबीआयला या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी ४५ दिवसांची मुदतवाढ दिली. या निर्णयाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावरील सुनावणी प्रलंबित असताना, गेल्याच आठवड्यात दंडाधिकाºयांनी पुन्हा एकदा सीबीआयला आरोपपत्र दाखल करण्यासाठी ४५ दिवसांची मुदतवाढ दिली. देण्यात आलेल्या या मुदतवाढीमुळे या प्रकरणातील आरोपी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. मृदुला भाटकर यांच्यापुढे होती.

न्या. भाटकर यांनी दंडाधिकाºयांनी सीबीआयला दिलेल्या मुदतवाढीवर नाराजी दर्शविली. तसेच देण्यात आलेली ही मुदतवाढ रद्द करत आहोत, असे सरकारी वकिलांना याबाबत अधिक माहिती देताना सांगितले. त्यावर सरकारी वकिलांनी सीबीआयतर्फे अ‍ॅडिशनल जनरल सॉलिसीटर या केसमध्ये उपस्थित राहणार असल्यामुळे, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्यांची ही विनंती ऐकून घेतल्यानंतर त्यावर न्यायालयाने याप्रकरणी २३ जानेवारी रोजी पुढील सुनावणी ठेवत त्याच दिवशी यासंदर्भातील आदेश देऊ, असे स्पष्ट केले आहे.अद्याप आरोपपत्र नाहीनालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना अटक करण्यात आली. पुढे पोलीस चौकशीदरम्यान कळसकर आणि अंदुरे यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याचे उघडकीस आले. त्यांना अटक करून पाच महिने उलटले, तरीही या आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही.