शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरेतील वृक्ष मृत्यूपंथाला...

By admin | Updated: April 25, 2016 05:46 IST

पश्चिम उपनगरातील आरे कॉलनीमधील वृक्षांची कत्तल होत असतानाच, आता येथील वृक्ष पाण्याभावी जळू लागल्याची तक्रार होत आहे आणि जे वृक्ष जिवंत आहेत

मनोहर कुंभेजकर,  

मुंबई- पश्चिम उपनगरातील आरे कॉलनीमधील वृक्षांची कत्तल होत असतानाच, आता येथील वृक्ष पाण्याभावी जळू लागल्याची तक्रार होत आहे आणि जे वृक्ष जिवंत आहेत, त्यांना पाणी देण्यासाठी आरे प्रशासन कूपनलिकेला परवानगी देत नसल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो तीन भुयारी मार्गासाठी आरेमध्ये कारशेड उभारण्याचा वाद पेटला असतानाच, येथील वृक्ष पाण्याविना जळत असल्याचे बजरंग दलाचे कार्यकर्ते बाळू बंगर यांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, येथील सुमारे ३ हजार २५० एकरवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. शिवाय मेट्रो कारशेडच्या नावाखाली येथील वृक्षांचा बळी घेतला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, येथील वृक्षांची कत्तलही होत असून, त्याकडे आरे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.आरे कॉलनीमधील वृक्षांना पाणी देता यावे, म्हणून आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन राऊत हे कूपनलिकेसाठी परवानगी देत नसल्याने, प्रश्न आणखी जटील झाला आहे, असेही बाळू बंगर यांनी सांगितले. यापूर्वी जेव्हा येथील वृक्ष तोडण्यात आले, तेव्हा सामाजिक संस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर पुन्हा झाडांची लागवड करण्यात आली, परंतु सातत्याने असे प्रकार होत असल्याने येथील वनराई कशी टिकून राहणार, असा सवाल बाळू बंगर यांनी केला आहे.आरे कॉलनीमधील वृक्ष पाण्याभावी जळू नयेत, म्हणून बजरंग दलाचे कार्यकर्ते डोक्यावर घागर घेऊन येथील वृक्षांना पाणी घालत आहेत.