शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड

By admin | Updated: July 2, 2016 03:19 IST

रेवदंडा येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून गेली चार वर्षे सर्व प्रमुख रस्त्यांवर झाडे लावली आहेत.

नेरळ : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ यासाठी एक ध्येय समजून पर्यावरण राखण्यासाठी रेवदंडा येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून गेली चार वर्षे सर्व प्रमुख रस्त्यांवर झाडे लावली आहेत. केवळ झाडे लावून प्रतिष्ठान थांबले नाहीत तर त्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी श्री सदस्य घरातील काम असल्यासारखे करीत आहेत. कर्जत तालुक्यात श्री सदस्यांनी शुक्रवारी दिवसभरात विविध आठ ठिकाणी तब्बल ९२ हजार झाडांची लागवड केली. कर्जत तालुक्यात वन, महसूल विभाग तसेच शासनाचे सर्व विभाग यांच्या माध्यमातून कृषी दिनी वृक्षारोपण कार्यक्र म राबविला जाणार आहे. मात्र जिल्ह्यात पर्यावरण टिकून राहावे, यासाठी गेली काही वर्षे सातत्याने काम करणारे रेवदंडा येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने शासनाच्या या उपक्र मात पुढाकार घेतला आहे. केवळ रायगड जिल्ह्यातील नाही तर राज्यातील अनेक रस्ते डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हिरवेगार झाले आहेत. तालुक्यातील बळीवरे, नालधे, किरवली, वांजळे, कळंब, माथेरान, नेरळ आणि शेलू अशा आठ ठिकाणी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून झाडे लावण्यात आली. या आठ ठिकाणी मिळून तब्बल ९२ हजार झाडे दिवसभरात लावण्यात आली. या सर्व झाडांचे संगोपन कर्जत तालुक्यातील श्री सदस्य करणार असल्याचे धर्माधिकारी प्रतिष्ठानने जाहीर केले आहे. बळीवरे येथील टेकडी पुढील काही वर्षांत हिरवीगार होणार आहे.