शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’ची चिकित्सा; ग्रामसभेला अधिकार देण्याची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 06:48 IST

योजना अधिक कार्यक्षमपणे राबविण्यासाठी गावाऐवजी पाणलोट क्षेत्र विकासाच्या निकषाची गरज जलयुक्त शिवार अभियान योजनेचे मूल्यमापन अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई : पुण्यातील ‘द युनिक फाउंडेशन’ या संशोधन संस्थेने जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्यातील विविध विभागांत केलेल्या अभ्यासानंतर त्यात काही त्रुटी आढळल्या आहेत. ही योजना अधिक कार्यक्षमपणे राबविण्यासाठी गावाऐवजी पाणलोट क्षेत्र विकासाच्या निकषाची गरज जलयुक्त शिवार अभियान योजनेचे मूल्यमापन या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. योजनेची चिकित्सा करताना सरकारला काही शिफारशीही करण्यात आल्या आहेत.संरचनेसंदर्भात काही शिफारशी करताना कामांच्या उत्तरदायित्वाबाबत स्पष्ट निर्देश आणि समन्वय असावा, सकारात्मक हस्तक्षेप व देखभाल करणारी यंत्रणा उभारावी तसेच कंत्राटदारांवर नियंत्रण ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. योजनेसंदर्भातील विविध विभागांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती करणे, तक्रार निवारण आणि कार्यवाही करणाऱ्या यंत्रणेची निर्मिती, वाळू उपसा, वृक्षतोड थांबविणे, मशीनचा अतिवापर टाळावा, योजनेत पारदर्शकता हवी, मृदा संवर्धन व्हावे, वाळू उपसा थांबावा आदी शिफारशी प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यात आल्या आहेत.दुष्काळ निर्मूलन कसे होणार?नव्याने काहीच मांडणी न करता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांना एकत्र करून जलयुक्त शिवार अभियान योजना तयार करण्यात आल्याचे अभ्यासात आढळले आहे. या योजनेमुळे दुष्काळ निवारण होणे शक्य होईल का, याबाबतही अहवालात साशंकता व्यक्त करण्यात आली आहे.जलयुक्त शिवार योजनेतून जेथे चांगली कामे झाली तेथे ऊस लागवड आणि बोअरवेल घेण्याच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली. पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्व, स्थानिक कार्यकर्ते आणि स्वत: शेतकरी योजनेविषयी जागृत आहेत. त्या तुलनेत मराठवाडा व विदर्भात स्थानिक नेतृत्व व प्रशासन उदासीन दिसून आले. लोकसहभागही कमी आढळून आला.- विवेक घोटाळे (कार्यकारी संचालक), द युनिक फाउंडेशन, पुणे

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार