शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासाठी खजिना खुला !

By admin | Updated: February 13, 2016 02:32 IST

शाश्‍वत शेतीशिवाय शेतक-यांचा विकास अशक्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन.

अकोला: विकासाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिलेल्या विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी शासनाचा खजिना उघडला गेला पाहिजे. या भागाच्या विकासासाठी मी जोपर्यंत आहे, तोपर्यंत मागून घ्या असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अकोल्यात लोकप्रतिनिधींना केले.जिल्हा प्रशासनामार्फत अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित विविध शासकीय इमारतींचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला खासदार संजय धोत्रे, आ. भाऊसाहेब फुंडकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिसन बाजोरिया, आ. हरीश पिंपळे, आ. बळीराम सिरस्कार, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधीर सावरकर व आ. आकाश फुंडकर प्रामुख्याने उपस्थित होते.दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी सरकारने १८ हजार कोटी रुपये दिले. परंतु या मदतीने शेतकर्‍यांचे भले होणार नाही. शाश्‍वत शेतीला शाश्‍वत सिंचनाची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.जलयुक्त शिवार दुष्काळावर रामबाण! वारंवार निर्माण होणार्‍या दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हा रामबाण उपाय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविल्यास शेतीला शाश्‍वत सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. राज्यात लोकसहभागातून राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार अभियान ही लोकचळवळ झाली असून, देशाच्या विविध भागात हे अभियान राबविण्याचे धोरण केंद्र सरकारने ठरविल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.