शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास धोक्याचा

By admin | Updated: June 27, 2016 05:23 IST

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित करण्यासाठी राज्य शासनाने चार वर्षांपूर्वी वाहतुकीचे स्वतंत्र धोरण आखले.

टीम लोकमत,

मुंबई- शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित करण्यासाठी राज्य शासनाने चार वर्षांपूर्वी वाहतुकीचे स्वतंत्र धोरण आखले. त्यासाठी कडक नियमावलीही तयार केली. मात्र प्रशासनाचा धाक नसल्याने शाळा प्रशासन आणि ठेकेदारांकडून नियमांची सर्रासपणे पायमल्ली सुरू आहे. शासनाच्या नाकावर टिच्चून आणि वाहतूक पोलिसांच्या डोळ््यादेखत मुंबई शहर आणि उपनगरांत शालेय विद्यार्थ्यांची नियमबाह्य वाहतूक सुरू आहे. पैसा कमावण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला वाऱ्यावर सोडले जात असल्याचे भीषण वास्तव ‘लोकमत’ ने रिअ‍ॅलिटी चेक’द्वारे उघडकीस आणले आहे.‘लोकमत’ प्रतिनिधींनी मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा आढावा घेतला. त्यात सरसकट सर्वच स्कूल बसकडून सुरक्षेसंदर्भातील काही महत्त्वाचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे दिसले. शाळांच्या मालकीच्या स्कूलबसबरोबरच ठेकेदारांमार्फत सुरू असलेल्या स्कूल बसमध्ये नियमांकडेही काणाडोळा झाल्याचे दिसून आले. महत्त्वाची बाब म्हणजे वाहतूक पोलिसांच्या डोळ््यांदेखत नियमबाह्य वाहतूक सुरू असूनही कारवाई मात्र शून्य असल्याचेच समोर आले. न्यायालयाच्या आदेशानंतर शाळांच्या सुट्ट्या संपण्यापूर्वी ‘फिटनेस सर्टिफिकेट’ असलेल्या स्कूल बसचीही पुन्हा तपासणी झाली. मात्र सुरक्षा नियमांना धाब्यावर बसवलेल्या बसला परवानगी मिळाल्याने तपासणीवरच साशंकता व्यक्त केली जात आहे.>सरकार अपयशीशाळा आणि ठेकेदारांकडून सुरू असलेल्या स्कूल बसच्या धंद्यावर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाची पर्वा न करता सुरू असलेल्या नियमबाह्य वाहतुकीवर कारवाई होणार का? असा प्रश्न आहे.