शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

फळ बाजारात कचऱ्याचे साम्राज्य

By admin | Updated: June 11, 2016 02:50 IST

एपीएमसी प्रशासनाने फळ मार्केटमध्ये उपाहारगृह व कँटीन उपलब्ध करून दिले आहेत.

नवी मुंबई : एपीएमसी प्रशासनाने फळ मार्केटमध्ये उपाहारगृह व कँटीन उपलब्ध करून दिले आहेत. परंतु कँटीनचे सांडपाणी वाहून नेण्याची यंत्रणाच नसल्याने पाणी रोडवर साचत आहे. एपीएमसीने कँटीनचालकांचेही प्रचंड नुकसान केले असून अधिकृत वाटप केलेल्या कँटीनचे बांधकाम करताना पालिकेची परवानगी घेतलेली नाही. बाजार समितीमधील देखभाल शाखेच्या अनागोंदी कारभाराविषयी असंतोष वाढू लागला आहे. पाचही मार्केटमधील एकही विकासकाम वेळेत व दर्जात्मक केलेले नाही. व्यापारी, कँटीन व इतर व्यावसायिकांची अडवणूक केली जात आहे. फळ बाजार नवी मुंबईत स्थलांतर झाल्यानंतर प्रशासनाने वर्तमानपत्रामध्ये उपाहारगृह भाडेतत्त्वावर देण्याची जाहिरात दिली होती. अनेक व्यावसायिकांनी रीतसर टेंडर भरून उपाहारगृहे चालविण्यासाठी घेतली आहेत. एपीएमसीने बांधकाम करून ते व्यवसायासाठी उपलब्ध केले परंतु अद्याप त्यासाठीची बांधकाम परवानगीच घेतलेली नाही. उच्च न्यायालयाने मूळ जागेपेक्षा अजून तेवढीच जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश बाजार समितीला दिले आहेत. परंतु त्यासाठी आवश्यक परवानगी महापालिकेकडून मिळवून दिली जात नाही. तुम्हीच परवानगी आणा असे व्यावसायिकांना सांगितले जात आहे. वास्तविक सर्व प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण करून देणे आवश्यक आहे. परंतु प्रशासन स्वत:ची जबाबदारी झटकत आहे. बाजार समितीमधील काही व्यावसायिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर येथील अनागोंदी कारभाराविषयी माहिती दिली. मार्केटमधील सर्व अनधिकृत बांधकामे अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच झाली आहेत. रीतसर निविदा भरून उपाहारगृह मिळविले परंतु प्रत्यक्षात आम्हाला करारपत्र देताना उपाहारगृहाचा उल्लेख केला नाही. यामुळे आम्हाला हॉटेल परवाना मिळविण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. येथील रस्ते व मलनि:सारण वाहिन्या टाकताना कँटीनचे पाणी मलनि:सारण वाहिनीमध्ये जाण्यासाठीची व्यवस्था उपलब्ध करून दिली नाही. यामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी रोडवर आलेले दिसत आहे. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकांचा फटका येथे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना बसत असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)