शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

गणेशोत्सवाच्या वर्गणीवरुन ट्रान्सपोर्ट कार्यालयाची तोडफोड

By admin | Updated: September 5, 2016 23:25 IST

वर्गणी कमी घ्या,’ असे म्हटल्याच्या कारणावरून युवकांनी हल्ला करून एका ट्रान्सपोर्ट व्यवस्थापकासह तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कार्यालयाची तोडफोड केली.

ऑनलाईन लोकमत 
शिरवळ, दि. ५ -  ‘गणेशोत्सवासाठी वर्गणी कमी घ्या,’ असे म्हटल्याच्या कारणावरून युवकांनी हल्ला करून एका ट्रान्सपोर्ट व्यवस्थापकासह तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी शिदेंवाडी येथील हनुमान गणेशोत्सव मंडळातील सहा ते सात जणांविरुद्ध शिरवळ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिदेंवाडी येथे एक ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातील व्यवस्थापक राजकुमार ओमकारमल शर्मा यांच्यासह कर्मचारी सुनील शुक्ला, सोनू शर्मा, राकेश ठाकूर हे बसले असताना अनोळखी सहा ते सातजण कार्यालयात आले. यावेळी संबंधितांनी ‘आम्ही हनुमान गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते असून, गणपतीच्या वर्गणीसाठी आलो आहोत. आम्हाला दीड हजार रुपयांची वर्गणी द्या,’ असे संबंधितांनी सांगितले. 
 
यावेळी व्यवस्थापक राजकुमार शर्मा यांनी ‘ऐवढे पैसे देणार नाही, आपण दोनशे रुपये घ्या,’ असे सांगितले. त्यावेळी संबंधित कार्यकर्त्यांनी अचानक राजकुमार शर्मा तसेच सुनील शुक्ला, सोनू शर्मा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. यावेळी शर्मा यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, हनुमान गणेशोत्सव मंडळाच्या सहा ते सात जणांविरुद्ध शिरवळ पोलिस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार संतोष मठपती तपास करीत आहे. 
 
खुर्ची, प्रिंटर अन् फोनचे नुकसान 
त्यातील एकाने लोखंडी पाईपने मारहाण करत शिवीगाळ करीत आम्हाला ‘तुम्ही गणपतीची वर्गणी दिली नाही तर तुम्हाला हाकलून लावू,’ अशी धमकी दिली. यावेळी संबंधितांनी कार्यालयातील खुर्ची, प्रिंटर, टेलिफोनचे तोडफोड करत सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान केले.