शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

‘गीतरामायण’चा आठ भाषांमध्ये अनुवाद

By admin | Updated: March 28, 2017 02:55 IST

गजानन दिगंबर माडगूळकर ऊर्फ गदिमा यांची सिद्धहस्त लेखणी आणि त्यांच्या शब्दांना सुधीर फडके ऊर्फ बाबूजींनी

पुणे : गजानन दिगंबर माडगूळकर ऊर्फ गदिमा यांची सिद्धहस्त लेखणी आणि त्यांच्या शब्दांना सुधीर फडके ऊर्फ बाबूजींनी चढविलेला स्वरसाज अशा दोन प्रतिभासंपन्न दिग्गजांच्या परिश्रमातून साकार झालेली अजरामर कलाकृती म्हणजे ‘गीतरामायण’. सांस्कृतिक एकात्मकतेचे प्रतीक असलेले आणि रामायणाचा मूळ आत्मा असलेले हे गीतरामायण आज आठ भाषांमध्ये अनुवादित झाले आहे, या भाषांमध्ये त्याचे विविध कार्यक्रम होत आहेत. उद्या (बुधवारी) विश्व हिंदू परिषद आणि भारत विकास परिषद यांच्या वतीने गरवारे कॉलेज येथे ‘गीतरामायण’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच येत्या १0 एप्रिल रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे पहिल्यांदाच गीतरामायणाचे सूर गुंजणार असल्याची माहिती गदिमांचे चिरंजीव आनंद माडगूळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी दत्ता चितळे, श्रीनिवास कुलकर्णी, रमेश विश्वरूपे, हेमंत धर्मावत, किशोर चव्हाण, श्रीकांत चिल्लाळ व अन्य मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे निवेदन अभिनेते राहुल सोलापूरकर करणार आहेत. काही दुर्मीळ आठवणी आणि गीतरामायणाच्या आजपर्यंतच्या वाटचालीमधील काही रंजक किस्से ते कथन करतील. पुण्यातील कार्यक्रमाचे निवेदन ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर करणार आहेत. (प्रतिनिधी)भारत विकास परिषदेतर्फे गेल्या दहा वर्षांपासून गीतरामायणाचा कार्यक्रम श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सादर केला जातो. एक छंद म्हणून आणि गीतरामायणाबद्दलचे मनस्वी आकर्षण म्हणून दत्ता चितळे यांनी गीतरामायणाचा अभ्यास करून ते प्रभावीपणे आत्मसात केले आहे. हा कार्यक्रम गायक दत्ता चितळे, तुषार रिठे, प्रार्थना साठे, राधिका इंगळहळ्ळीकर, भक्ती दातार आदी कलाकार सादर करणार आहेत. उद्या (बुधवार) गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी ६ ते ९ या वेळेत कार्यक्रम सादर होणार आहे.