शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आठ मद्यालयांचे स्थलांतर

By admin | Updated: May 20, 2017 01:08 IST

एकूण १८५ प्रस्ताव : एप्रिल महिन्याचा १४ कोटींचा महसूल बुडाला

एकनाथ पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क  कोल्हापूर : महामार्गालगत ५०० मीटर अंतरावर असणारी जिल्ह्यातील सुमारे १३५५ पैकी १०२६ मद्यालये सीलबंद झाली होती. त्यापैकी आठ मद्यालये स्थलांतर झाली असून, १८५ प्रस्ताव कागदपत्रातील त्रुटींमुळे प्रलंबित आहेत. मद्यालय बंदीमुळे एप्रिल २०१७ या महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सुमारे १४ कोटींचा महसूल बुडाला आहे.कारवाई झालेल्या वाईन शॉप, परमिट रूम, बीअर शॉपी, तसेच देशी दारू दुकानात पाठीमागील दरवाजातून चोरटी मद्य विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात ‘वॉच’ ठेवून १४१ गुन्हे दाखल करून ७७ व्यक्तींना अटक केली. त्यांच्याकडून सहा वाहनांसह सोळा लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. जिल्ह्यात १३५५ मद्यालये होती. नूतनीकरण व अबकारी कर यामध्ये वर्षाला २२० कोटींचा महसूल राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळत होता. त्यासाठी या विभागाकडे १८५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र ५०० मीटर अंतरापर्यंतची असणारी सर्व मद्यालये बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि त्याचा फटका तारांकित हॉटेलसह नामवंत हॉटेलच्या १०२६ मद्यालयांना बसला. १ एप्रिल २०१७ पासून ही मद्यालये बंद आहेत. सध्या जिल्ह्यात ४०४ मद्यालये सुरू आहेत. मद्यविक्री परवाना असणाऱ्या हॉटेलमध्ये लोकांची गर्दी असायची. ही हॉटेल आता ओस पडल्याने हॉटेल व्यावसायिकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे, तर अनेक कामगारांना नोकरी नसल्याने त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सीलबंद झालेल्या दुकानदारांनी मद्यालये स्थलांतरित करून १९३ प्रस्ताव उत्पादन शुल्क विभागाला सादर केले आहेत. त्यापैकी आठ मद्यालयांना परवानगी दिली आहे. स्थलांतर दुकाने अशीकोल्हापूर शहर - तीन वॉईन शॉप (धैर्यप्रसाद चौक, हॉकी स्टेडियम, खानविलकर पेट्रोल पंप) इचलकरंजी - १ (वॉईन शॉप) गोकुळ शिरगाव - देशी दारूसरवडे (ता. कागल) - देशी दारू आजरा - परमिट रुम ५०० मीटर अंतराच्या बाहेर जिल्ह्यात आठ मद्यालयांना स्थलांतरास परवानगी दिली असून, १८५ प्रस्ताव प्रलंबित आहेत. बंदीमुळे एप्रिल महिन्यात १४ कोटींचा महसूल बुडाला. - संजय पाटील, प्रभारी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क