शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

संक्रमण शिबिराचे धोरण फेब्रुवारीत

By admin | Updated: January 13, 2016 02:25 IST

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरांमध्ये सुमारे १० हजार जणांनी घुसखोरी केली आहे. या घुसखोरांना पात्र-अपात्र करण्याबाबतचे धोरण पुढील महिन्यात

मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरांमध्ये सुमारे १० हजार जणांनी घुसखोरी केली आहे. या घुसखोरांना पात्र-अपात्र करण्याबाबतचे धोरण पुढील महिन्यात लागू करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी दिली.मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाची शहर आणि उपनगरात ५६ संक्रमण शिबिरे आहेत. या शिबिरांमध्ये सुमारे १0 हजार जणांनी घुसखोरी केल्याचे म्हाडाने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. घुसखोर म्हाडाला कोणतेही भाडे न भरता राहत आहेत; तसेच या खोल्यांवर ते मालकीहक्क सांगत असल्याने म्हाडाने त्यांच्याकडून विशिष्ट रक्कम घेऊन कायम करण्याचा विचार म्हाडा करत आहे. त्यानुसार शासनाकडे प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. परंतु या प्रस्तावावर अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही.या निर्णयाबाबत गृहनिर्माण मंत्री महेता यांना विचारले असता, त्यांनी संक्रमण शिबिराचे धोरण फेब्रुवारीपर्यंत लागू करण्यात येईल, असे सांगितले. शासनाने निर्णय घेतल्यास संक्रमण शिबिरातील घुसखोरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.धारावीत रहिवाशांच्या विरोधाची शक्यता?धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सेक्टर ५ चे काम म्हाडामार्फत करण्यात येत आहे. म्हाडाने धारावीत ३५८ घरांची इमारत उभारली आहे. क्लस्टर जे मधील रहिवाशांची पात्रता निश्चित झाल्याने या घरांच्या वितरणासाठी २६ जानेवारीला लॉटरी काढण्याची तयारी म्हाडाने सुरु केली आहे. परंतु ही घरे ३00 चौरस फुटाची असल्याने त्याला रहिवाशांकडून विरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.