शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; विश्वास नांगरे-पाटील नाशिकचे आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 05:15 IST

एटीएसचे सुहास वारके झाले कोल्हापूरला पोलीस महानिरीक्षक

मुंबई : लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यास आठवडाभराचा अवधी उरला असताना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आयजी ते एसीपी दर्जाच्या ४१ अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी जाहीर केल्या. त्यानुसार नाशिकचे आयुक्त रवींद्र सिंघल यांची औरंगाबाद परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकपदी बदली झाली. त्यांचा पदभार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे सोपविला आहे.

नांगरे- पाटील यांच्या जागी दहशतवाद विरोधी पथकातील महानिरीक्षक सुहास वारके यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासह आठ विशेष महानिरीक्षक, चार उपमहानिरीक्षक, दहा अधीक्षक, सहा अप्पर अधीक्षक, १३ उपअधीक्षक, साहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.महानिरीक्षक दर्जाच्या औरंगाबाद परिक्षेत्राचे महानिरीक्षक पी.पी. मुत्याल यांची नांदेड परिक्षेत्रात बदली झाली. तेथील एफ.के. पाटील यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुण्यातील रिक्तपदावर नियुक्ती करण्यात आली. सीआयडीचे सुनील रामानंद यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सुरक्षा महामंडळातील प्रवीण साळुंखे यांची बदली करण्यात आली.

नाशिक ग्रामीणचे अधीक्षक संजय दराडे यांची पदोन्नतीवर विक्रीकर विभागात नियुक्ती केली आहे, त्याचप्रमाणे एटीएसमधील उपमहानिरीक्षक दत्ता कराळे यांची ठाणे शहरात पूर्व प्रादेशिक विभागात बदली केली आहे. तेथील प्रताप दिघावकर यांना एक पद पदावनत केलेल्या महिला अत्याचार प्रतिबंध विभागाकडे नियुक्ती केली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या जयंत नाईकनवरे यांची एटीएसला बदली करण्यात आली आहे.

देवेन भारती यांना मिळाले अभयनिवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आयजी ते एसीपी दर्जाच्या ४१ अधिकाºयांच्या बदल्या केल्या. मात्र मुंबईचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांना मात्र अभय देण्यात आले आहे. वास्तविक १५ एप्रिलला त्यांना या पदावर चार वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांचा त्यांच्यावर विश्वास असल्याने त्यांना आयोगाच्या निर्देशातून अभय देण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. निवडणुकांनंतर पदोन्नती देऊन त्यांची या ठिकाणाहून अन्यत्र बदली केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येते