जव्हार : जव्हार प्रकल्प कार्यालाय व आदिवासी शिक्षण व बहुजन विकास शैक्षणिक संस्थेमार्फत जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा या तालुक्यांतील अनुसुचित जमातीच्या दारीद्रय रेषेखालील ४४ आदिवासी वनपटट्ेधारक व इतर शेतकरी लाभार्थ्यांना १०० % अनुदान तत्वार वनोपज मालावर प्रक्रिया करण्याचे यशस्वी प्रशिक्षण देऊन विविध प्रकारची रोपे व साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी संस्थेचे पदाधिकारी तथा प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.‘वनोपज’ म्हणजे जंगलातीला पिकणारे फळ यामध्ये मोह, शेवगा, जांभूळ, कांचन, पपई, फणस, आवळा ही फळे जंगलात सहज उपलब्ध होतात. त्यावर मोठ्याप्रमाणात प्रक्रिया करून विविध ज्युस, औषधे व लोणची तयार केली जातात परंतु या प्रक्रीयेचे ज्ञान व त्यासाठी लागणारी साधने येथील लाभार्थ्यांकडे नव्हती. शेती खेरीज दुसरे कुठलेच पर्याय या शेतकऱ्यांकडे नव्हते, त्यामुळे शेती नंतर या लाभार्थ्यांना पोटाच्या खळगीसाठी स्थलांतर करून वणवण भटकंती करावी लागत होती, परंतु शासनाच्या या योजनेमुळे या लाभार्थ्यांना विविध रोपे व टिकाव, फावडा, कोयता, झारी, बादली, घमेला सारख्या वस्तूंचे वाटप केल्यामुळे हे लाभार्थी घर बसल्या या झाडांपासून निघणाऱ्या पिकापासून चांगले उत्पन्न घेऊ शकणार आहेत, त्यामुळे या योजेनेचा येथील लाभार्थ्यांना चांगला लाभ झालेला आहे. यात लाभार्थ्यांना प्रत्यक्षात थिअरी व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सनसेट पॉइंट रोड वरील मेमन हॉल येथे देण्यात आले. जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा हे तालुके अतिदुर्गम आदिवासी तालुके असल्यामुळे येथील आदिवासी लाभार्थ्यांना दारीद्रय रेषेखालील आहेत, त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करणे शक्य होत नाही, तसेच पावसाळ्यानंतर शेती असून सुध्दा त्यांच्याकडे मोलमजुरी खेरीज केल्याखेरीज त्यांना कोणताही रोजगार नसल्याने त्यांना स्थलांतर करावे लागत होते. ते आता थांबेल. (वार्ताहर)>आर्थिक स्तर उंचावणारआदिवासी विकास विभागाच्या विशेष केंद्रिय सहाय्य योजनेमुळे या आदिवासी लाभार्थ्यांना १०० % अनुदानाने वनोपज मालावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण, रोपे व साहित्य दिल्याने लाभार्थ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत झालेली आहे.
वनोत्पादनांवर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण
By admin | Updated: June 10, 2016 03:32 IST