शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएनएस सिंधुरक्षक’वर होणार प्रशिक्षण केंद्र

By admin | Updated: November 18, 2015 03:05 IST

अपघातग्रस्त आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडी सेवेतून कमी करण्याचा विचार असतानाच आता याच पाणबुडीवर नौदलासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

- सुशांत मोरे,  मुंबईअपघातग्रस्त आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडी सेवेतून कमी करण्याचा विचार असतानाच आता याच पाणबुडीवर नौदलासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नौदलाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. २0१३ मध्ये मुंबईतील समुद्रात अपघात होऊन या पाणबुडीवर १८ जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर ही पाणबुडी निवृत्त केली जाणार होती. आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीला विशाखापट्टणम येथे आग लागली होती. यात एका खलाशाचा मृत्यू झाला. अपघातानंतर सिंधुरक्षकला दुरुस्ती आणि सुधारणांसाठी रशियात पाठविण्यात आले.जानेवारी २0१३ मध्ये ती पुन्हा नौदलाच्या सेवेत आली. १४ आॅगस्ट २0१३ रोजी मुंबईतील नौदलाच्या गोदीत शस्त्रांनी भरलेल्या या पाणबुडीत स्फोट होऊन आग लागली आणि यात १८ कर्मचाऱ्यानी प्राण गमवले. या घटनेत सिंधुरक्षकला जलसमाधी मिळाली होती. १७ जून २0१४ला पाणबुडीला बाहेर काढण्यात यश आले. मुंबईत नौदलाच्या गोदीत उभ्या असलेल्या या पाणबुडीची डागडुजीही करण्यात आली. मात्र नंतरही तीला वापरात आणणे शक्य नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तिला सेवेतून कमी करण्यात येणार होते. अखेर या पाणबुडीवर नौदलासाठीच प्रशिक्षक केंद्र उभारण्याचा निर्णय घेतलाआहे. नौदल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी सेवेतेल्या पाणबुडीत जावे लागते आणि प्रत्यक्षात प्रशिक्षण घ्यावे लागते. मात्र पूर्व प्रशिक्षण देणारी सेवा नौदलाकडे नसल्याने या पाणबुडीवर तसे केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील अशा प्रकारचे पहिले केंद्र असून यावर संरक्षण मंत्रालयाकडून लवकरच निर्णयही घेतला जाईल, असे सांगण्यात आले. या पाणबुडीला मुंबईतील समुद्रात स्फोटानंतर जलसमाधी मिळाली होती. पाणबुडीला बाहेर काढणे गरजेचे होते; तशी यंत्रणा आपल्याकडे नव्हती. अखेर आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात आली. यात साल्वेज अ‍ॅण्ड फाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेला याचे काम देण्यात आले आणि तब्बल २00 कोटी रुपये ही पाणबुडी बाहेर काढण्यासाठी खर्च केले.