शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हे हाताळण्याचे २३० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

By admin | Updated: January 24, 2016 00:32 IST

महाराष्ट्रात प्रथमच विदर्भातील २३०पेक्षा जास्त अधिकारी नागपूरच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने (एफएसएल) सायबर आणि टेप फोरेन्सिक्सचे प्रशिक्षण देऊन तयार केले आहेत.

मुंबई : महाराष्ट्रात प्रथमच विदर्भातील २३०पेक्षा जास्त अधिकारी नागपूरच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने (एफएसएल) सायबर आणि टेप फोरेन्सिक्सचे प्रशिक्षण देऊन तयार केले आहेत. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी तसेच त्यात पुराव्यांची जमवाजमव करण्यासाठी अधिकाऱ्यांना सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे. मूळ चित्रांमध्ये फेरफार वा बदल करून (मॉर्फड् इमेजेस) कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचे प्रकार कसे रोखायचे, याचेही प्रशिक्षण त्यांना देण्यात आल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यात सायबर प्रयोगशाळा स्थापन करणार आहे. सायबर गुन्हे हाताळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यास पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना सांगण्यात आले आहे. महासंचालक (विधी व तांत्रिक) मीरा बोरवणकर यांनी त्यानुसार प्रशिक्षण आयोजित केले होते. प्रत्यक्ष गुन्हा घडताना व्हिडीओ टेपचे रेकॉर्डिंग झाले आहे किंवा अन्य कोणीतरी त्यात बदल केला आहे, याचे विश्लेषण करण्याचे प्रशिक्षण आम्ही विदर्भातील ३० अधिकाऱ्यांना दिले आहे. दुसऱ्या सत्रामध्ये २००पेक्षा जास्त पोलीस अधिकाऱ्यांना (निरीक्षक आणि उपअधीक्षक दर्जाचे) सायबर गुन्ह्यांतील पुरावे कसे हाताळायचे व ते जपायचे, याची माहिती देण्यात आल्याचे नागपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे उप संचालक नितीन चुटके यांनी सांगितले.अधिकाऱ्यांना हॅश व्हॅल्यू आणि हॅश व्हॅल्यू कॅलक्युलेशन तंत्राची माहिती देण्यात आली. प्रत्येक व्हिडीओ आणि आॅडिओला एक स्वतंत्र हॅश व्हॅल्यू असते. त्यात फेरफार केल्यास हॅश व्हॅल्यूमध्ये बदल होतो. नेमका किती फेरफार करण्यात आला. हे शोधण्याचे प्रशिक्षणही पोलिसांना दिल्याचे नितीन चुटके यांनी सांगितले.नागपूर, अमरावती आणि गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना कॉम्प्युटर फोरेन्सिक्स, पायरसी, सॉफ्टवेअर मॅन्युपलेशन, मोर्फींग आणि एमएमएस स्कँडल्स अशा बाबींचाही प्रशिक्षणात अंतर्भाव होता. मूळ छायाचित्रांमध्ये आक्षेपार्ह बदल करून ते सोशल मीडियावर व्हायरल होण्यामुळे अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकरणात पुरावे कसे गोळा करायचे, ते कसे जतन करून ठेवायचे व प्रयोगशाळांकडे सुपुर्द करायचे, याचे राज्यात प्रथमच प्रशिक्षण दिल्याचे नितीन चुटके म्हणाले.