शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

झाड कोसळल्याने रेल्वे मार्ग चार तास बंद

By admin | Updated: September 19, 2016 02:44 IST

अलिबाग तालुक्यातील किनारपट्टीलगत संततधार पाऊस आणि वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली.

कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील किनारपट्टीलगत संततधार पाऊस आणि वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली. वायशेत येथील आरसीएफ या कारखान्यातील युरिया खत मालगाडीने वाहून नेले जाते, त्या मालगाडीच्या मार्गावर झालखंड-जलपाडा दरम्यान मोठे झाड कोसळले होते. त्यामुळे टीव्हीएसजी सीडी (थळ-चंद्रपूर) ही ४३ डब्यांची मालगाडी मार्ग बंद पडल्यामुळे रविवारी तीन चार तास रुळावर थांबवण्यात आली होती.गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वादळी पावसामुळे मच्छीमारी संघटनेतर्फेकोळी बांधवांना सावधानतेचा इशारा शनिवारीच देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या सूचनेनुसार ४८ तासात रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी व वाऱ्याचा वेग ४५ ते ५५ किमी प्रति तास असा राहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीत असणार आहे. या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड यांच्यामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता त्याचे पडसाद अलिबागमध्ये पहावयास मिळाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून माहिती मिळताच तालुक्यातील मांडवा-बोडणी, रेवस येथील कोळी बांधवांना संघटनेचे अध्यक्ष विश्वास नाखवा यांनी बंदरावर सूचना लिहून खोलवर मच्छीमारीसाठी गेलेल्या कोळी बांधवांना फोन व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आपत्तीबाबत सूचना दिल्या. वादळीवाऱ्याचा तडाखा वीजवितरण विभागाला देखील बसला.गणपती उत्सव काळात वीज व्यवस्थापनाकडून चोख कामगिरी बजावल्यानंतर अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे ठिकठिकाणी विजेचे खांब व तारा कोसळल्या. सकाळपासूनच वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे कुसुंबळे येथे उच्च दाबाच्या वीजवाहिनीचा खांब कोसळला. मांडवा धोकवडे येथे दोन खांब अलिबाग पोलीस वसाहत आणि चोंढी येथे विजेचे खांब पडले, तर झराडी गुंजीस आणि कनकेश्वरफाटा येथे विद्युत वाहक तारा झाडांमुळे तुटल्या. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरिता वीज कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली, असे अलिबागचे कार्यकारी अभियंता आय. ए. मुलानी यांनी सांगितले. (वार्ताहर)वाऱ्याने उडाले इमारतीचे पत्रे >शिघे्र येथे शेतकऱ्याचे घर पडलेआगरदांडा : गुरु वारी सायंकाळी प्रचंड वेगाने वारे वाहून मुरुड तालुक्यात जोरदार पावसाचे आगमन झाले. पाच ते सात तास पाऊस पडल्याने २३१ मि.मी.नोंद झाली आहे. शेतीला आवश्यक असा पाऊस पडला परंतु प्रचंड वेगाने वारे वाहिल्यामुळे शिघ्रे येथील शेतकरी गोविंद पाटील यांच्या घरावरील कौले, लाकडी वाशे, रिफा, भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.अलिबाग : जोरदार वाऱ्यामुळे येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीचे पत्रे उडून गेले. घटनास्थळी नागरी संरक्षण दलाने धाव घेत पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीवरील काही पत्रे काढून टाकले. दुपारी दोनच्या सुमारास पाऊस सुरु होता. त्याचवेळी वाराही वेगाने वाहत होता. जिल्हा परिषदेची इमारत समुद्रा जवळच असल्याने वाऱ्याच्या वेगापुढे त्याचे पत्रे उडाले. त्यावेळी नागरी संरक्षण दलाचे जन संपर्क अधिकारी जयपाल पाटील तेथे काही सहकाऱ्यांसह पोचले. त्यांनी रस्त्यावरील वाहतूक थांबवली. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या कर्मचारी खबरदारी घेत वाऱ्याच्या दाबाने उडणारे पत्रे काढले. नुकसान डोळ्यासमोर असताना, आकस्मिक निधीची तरतूद सुद्धा असताना तातडीने रक्कम अदा व्हावी अशी मागणी गोविंद पाटील या शेतकऱ्याने केली आहे. अचानक पडलेल्या या पावसामुळे वीज व दूरध्वनी यंत्रणा चार ते पाच तास गायब झाली होती. यामुळे मोठ्या अडणींचा सामना ग्रामस्थांना करावा लागला. मुरु ड तालुक्यात २७ डिग्री असणारे तापमान खूप खाली येऊन हवेत गारवा निर्माण झाला आहे. कार्लेखिंड : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यातील शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे येथील शेतकरी शेतीमधून जास्तीत जास्त उत्पन्न कशाप्रकारे घेता येईल या पध्दतीने मेहनत करत असतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतकरी भात लागवड करतात. भात पीक घेतल्यानंतर भाजी लागवड केली जाते. भाताची संकरित जातीची बियाणे असल्यामुळे नव्वद दिवसांत तयार होतात. अशाप्रकारे बहुतांश शेती तयार होण्याच्या मार्गावर असताना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. कणसे आल्यामुळे वजन वाढल्याने वाऱ्यामुळे पिके जमिनीवर पडली आहेत. मेहनतीने आलेल्या पिकाचे नुकसान पाहून शेतकरी चिंतेत आहे.