शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

कल्याणात कचोरे येथे दरड कोसळली

By admin | Updated: September 19, 2016 03:33 IST

नेतीवली टेकडी असो अथवा कचोरे याठिकाणी दरड कोसळण्याचा सिलसिला यंदाही कायम आहे.

कल्याण : नेतीवली टेकडी असो अथवा कचोरे याठिकाणी दरड कोसळण्याचा सिलसिला यंदाही कायम आहे. रविवारी दुपारी एकच्या सुमारास कचोरे हनुमाननगर परिसरातील टेकडीवरील दरड कोसळल्याची घटना घडली. यात सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. भले मोठे दगड घरंगळत खाली कोसळूनही ते एका घराजवळ येऊन थांबले. कचोरे येथील टेकडीवर आणि पायथ्याशी मोठया प्रमाणावर कुटुंबांचे वास्तव्य असून यात कुष्ठरूग्णांच्या १७० कुटुंबांचा समावेश आहे. रविवारी दुपारी अचानक दरड कोसळल्याची घटना घडली. तीन ते चार दगड घरंगळत खाली आले. परंतु यात कुणालाही दुखापत झाली नाही किंवा मालमत्तेचे नुकसान झाले ेनाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी आणि त्यांचे पती राजन चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. ड प्रभागाचे प्रभाग अधिकारी शांतीलाल राठोड आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या जागेची पाहणी केली. यात दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता त्याठिकाणच्या कुटुंबांना घरे रिकामी करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान दोन वर्षापूर्वी याठिकाणी दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला होता. कचोरे-नेतीवली धोका कायमकचोरेप्रमाणे नेतीवली टेकडीवरील दरड कोसळण्याचा धोका पावसाळयात कायम असतो. परिणामी या परिसरातील शेकडो कुटुंबांना जीव मुठीत धरूनच वास्तव्य करावे लागते. दरड कोसळून झालेल्या अपघातांचा आढावा घेता २००९ मध्ये नेतीवली येथे दरड कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला होता. तर ५ वर्षापूर्वी तिघांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाल्याची घटना घडली होती. मार्च २०१४ मध्येही जयभवानीनगर परिसरात घडलेल्या घटनेत दरड कोसळून ७ जखमी झाले. दोन वर्षापूर्वी कचोरे येथे एकाला आपले प्राण गमवावे लागले होते. आॅगस्ट २०१५ मध्येही सूचकनाका परिसरातील महात्मा फुले नगरमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली. याठिकाणी असलेल्या पठाण चाळीतील एका घरावर मोठ-मोठे दगड पडल्याने या घराच्या पाठीमागील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. रविवारच्या घटनेत सुदैवाने जीवित किंवा वित्तहानी झालेली नसली तरी शेकडो कुटुंबीयांच्या मनातील भीतीचे सावट यंदाही जैसे थे असल्याचे समोर आले आहे.