शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आसाममधील बालकांची तस्करी!

By admin | Updated: March 17, 2016 01:44 IST

कचरा उचलण्यासाठी अल्पवयीन मुलांची तस्करी होत असल्याचा खळबळजनक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. गरिबी आणि बेकारीचा फायदा घेऊन आसाममधील मुलांची तस्करी

नागपूर : कचरा उचलण्यासाठी अल्पवयीन मुलांची तस्करी होत असल्याचा खळबळजनक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. गरिबी आणि बेकारीचा फायदा घेऊन आसाममधील मुलांची तस्करी करण्यात येत आहे. सोलापूरच्या डम्पिंग यार्डमध्ये कचरा उचलण्यासाठी नेण्यात येत असलेल्या सहा आसामी मुलांची नागपुरात सुटका करण्यात आली. या घटनेमुळे मानवी तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारी दुपारी येथील रेल्वेस्थानकावर आसाममधील १२ ते १७ वयोगटांतील सहा मुले चाइल्ड लाइनच्या समन्वयक गौरी देशपांडे यांना दिसली. देशपांडे यांनी या मुलांची विचारपूस केल्यानंतर त्यांना संशय आला. मुलांसोबतच्या एका युवकाचीही त्यांनी चौकशी केली आणि रेल्वे पोलिसांना त्याची माहिती दिली. पोलिसांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत ही मुले आसाममधील बोरापट्टा येथील असल्याचे आढळले. मुलांना सोलापूर येथील डम्पिंग यार्डमध्ये कचरा उचलण्यासाठी नेण्यात येत होते. मैतुल इमाम हुसैन (२५) या दलालाच्या माध्यमातून त्यांना सोलापूर येथे पोहोचविण्यात येत होते. प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी बाल संरक्षण अधिनियमांतर्गत रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवकास अटक केली व सहाही मुलांना निरीक्षणगृहात पाठविण्यात आले. त्यांना त्यांच्या पालकांकडे सोपविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)गरिबी आणि बेकारीमुळे पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलांची तस्करी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात आंतरराज्य टोळी सक्रीय आहे. कचरा उचलणे, कारखान्यातील छोटी-मोठी कामे मुलांकडून करून घेण्यात येतात. आम्ही आसामच्या बाल संरक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. - मुस्ताक पठाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी