शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

वडघर पुलावर वाहतूक सुरूच

By admin | Updated: April 8, 2017 03:39 IST

सावित्री नदीवरचा जुना पूल वाहून गेल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जुने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते

मयूर तांबडे,पनवेल- गेल्या वर्षी गोवा महामार्गावरील महाड - पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा जुना पूल वाहून गेल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जुने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. पनवेलमधील ब्रिटिशकालीन वडघर-करंजाडे पूलदेखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.तब्बल८९ वर्षे जुना असलेला पनवेल येथील वडघर-करंजाडे पूल बंद केला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फेआॅगस्ट २०१६ मध्ये सांगण्यात आले होते. महाड येथील झालेल्या दुर्घटनेनंतर बांधकाम विभागाला हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याची जाग आली होती. आता कोणतीही डागडुजी न करता पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. वडघर-करंजाडे पूल उरण-पनवेल रस्त्यावरील गाढी नदीवरील पूल म्हणून ओळखला जातो. उपविभागाच्या अखत्यारीतील उरण-पनवेल दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १०३ वर गाढी नदीवर ब्रिटिशकालीन पूल १९२७ मध्ये बांधण्यात आलेला आहे. पुलाची लांबी १४८ मीटर असून त्यात ५९० मीटरचे २५ गाळे आहेत. याठिकाणी बाजूला नवीन पुलाची बांधणीसुद्धा करण्यात आली आहे. पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी पुलावरून वाहतूक करताना अपघात घडू नये, यासाठी बॅरीकेट्स लावून पुलावरील वाहतूक बंद केली होती. पुलावरून वाहतूक होऊ नये यासाठी दगड देखील लावण्यात आले होते. मात्र, वाहतूकदारांनी बॅरीकेट्स व दगड काढून वाहतूक सुरू केली आहे.वडघर-करंजाडे पुलाला वाहनतळाचे स्वरूप आले आहे. कमकुवत झालेल्या या जुन्या पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे असताना देखील चालक दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. चारचाकी गाड्या तसेच मोठमोठ्या टेम्पोची पुलावरून दिवस-रात्र वर्दळ असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने वेळीच याकडे लक्ष देऊन वाहतूक व्यवस्था बंद करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.वडघर पुलावरून वाहतूक सुरू झाल्याबाबत वाहतूक पोलिसांना कळविण्यात आले आहे. यापूर्वी ड्रम लावून संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला होता. पुन्हा एकदा तो रस्ता बंद करू. - एस.एम.कांबळे, सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम खाते, पनवेलसार्वजनिक बांधकाम खात्याने कायमस्वरूपी वडघर-करंजाडे पूल बंद केला असून, असा फलक या ठिकाणी लावणे गरजेचे आहे. तसेच बॅरीगेट्स लावून रस्ता बंद करायला हवा.- विजय कादबाने, पोलीस निरीक्षक, पनवेल शहर वाहतूक