शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कसारा घाटात वाहतूककोंडी

By admin | Updated: January 18, 2016 03:17 IST

मुंबई-नाशिक मार्गावर झालेल्या दोन अपघातांमुळे प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. कसाऱ्यातील साई खिंडीत गॅस टँकर उलटला, तर ओहळाचीवाडी येथे मक्याचा कंटेनर पलटी झाला.

कसारा : मुंबई-नाशिक मार्गावर झालेल्या दोन अपघातांमुळे प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. कसाऱ्यातील साई खिंडीत गॅस टँकर उलटला, तर ओहळाचीवाडी येथे मक्याचा कंटेनर पलटी झाला. पहिल्या घटनेत उरण येथून गॅस भरून जळगावला निघालेल्या गॅस टँकरला साई खिंडीत दोन कार ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्यात, या गॅस टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो नाल्यात पलटी झाला. गॅस भरलेला असल्याने पलटी झालेल्या टँकर धोकादायक ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे वाहतूक रोखण्यात आली. दरम्यान, शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ठाकूर, पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेत तज्ज्ञांकडून याबाबत खात्री केली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दुपारी दोनच्या सुमारास के्रनच्या साहाय्याने टँकर उचलण्यात आला. त्यानंतर, वाहतूक सुरळीत झाली. दुसऱ्या घटनेत जळगावहून मका घेऊन जाणारा भरधाव कंटेनर कसारा घाट उतरून ओहळाचीवाडी येथे वळण घेत असताना उलटला. दारूच्या नशेत असलेला कंटेनरचालक अनिल यादव याचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाल्याचे निदर्शनास आले. भररस्त्यात कंटेनर पलटी झाल्याने नाशिकहून मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास ठप्प होती. अपघातस्थळी कसारा पोलीस, घोटी व शहापूर महामार्ग पोलिसांसह गस्त पथकाने धाव घेतली. वाहतूककोंडी झाल्याने क्रेन आणण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गिनाके व राठोड पुढील तपास करीत आहेत.चेकपोस्टवरील कर्मचारी बचावलेभरधाव कंटेनर सुरुवातीला चिंतामणवाडी येथील चेकपोस्टवरील बॅरिकेड्स तोडून १०० फुटांवर पलटी झाला. चेकपोस्टवरील कर्मचारी थोडक्यात बचावले. कंटेनर पलटी होण्याच्या काही सेकंदांपूर्वी दोन कार कंटेनरला ओव्हरटेक करून पुढे गेल्याने त्याही बचावल्या.