शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

तळीरामांना वाहतूक नियम ‘अमान्य’

By admin | Updated: April 13, 2017 01:22 IST

राज्यात गेल्या दोन वर्षांत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील शहर, ग्रामीण भागातील

- सुशांत मोरे,  मुंबईराज्यात गेल्या दोन वर्षांत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील शहर, ग्रामीण भागातील रस्त्यांबरोबरच महामार्गांवर २०१६मध्ये केलेल्या कारवाईत तब्बल १ लाख ८ हजार ५६४ प्रकरणे दाखल झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांतील सूत्रांनी दिली. ही आकडेवारी पाहता चालकांना वाहतूक नियम मान्यच नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ रोखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यासाठी वेळोवेळी विशेष मोहीम हाती घेण्यात येते. तळीराम चालकांविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात येत असून, राज्यात २०१६मध्ये १ लाख ८ हजार ५६४ प्रकरणे दाखल झाल्याचे उघडकीस आले आहे. २०१५मध्ये कारवाईचा आकडा पाहिल्यास तो ५३ हजार ४९ एवढा होता. त्यामुळे दोन वर्षांत केलेली कारवाई पाहिल्यास ती दुप्पट झाल्याचे दिसते. याचाच अर्थ वाहन चालकांकडून बिनदिक्कतपणे नियमाला तिलांजली दिली जात आहे. त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईत १९ कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केल्याचे सांगण्यात आले.राज्यात एकूण होणाऱ्या अपघातांपैकी दारू पिऊन वाहन चालवताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण हे ०.५६ टक्के एवढे आहे. तर विविध अपघातांत मृत होणाऱ्यांपैकी ०.४५ टक्के मृत्यू हे दारू पिऊन वाहन चालवताना झालेल्या अपघातांतील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. २०१६मध्ये महामार्ग पोलिसांकडे दाखल असलेल्या अधिकृत माहितीत ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या अपघातांत सुमारे ५८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.