शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रेल्वेच्या शौचालयातून होते दुधाची वाहतूक!

By admin | Updated: March 10, 2016 03:58 IST

आरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या दुधाची रेल्वेच्या शौचालयातून वाहतूक असल्याचे वास्तव उघड झाले आहे. गोंदियाहून सुटणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या आरक्षित डब्यातील शौचालयात दुधाचे कॅन ठेवले जातात.

गजानन चोपडे,  नागपूरआरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या दुधाची रेल्वेच्या शौचालयातून वाहतूक असल्याचे वास्तव उघड झाले आहे. गोंदियाहून सुटणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या आरक्षित डब्यातील शौचालयात दुधाचे कॅन ठेवले जातात. त्यामुळे नागपूरला पुरविण्यात येणारे हे दूध आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. विशेष म्हणजे, रेल्वे व्यवस्थापन आणि पोलिसांसमोर हा प्रकार चालतो. त्या विरोधात कोणीही आवाज उठवलेला नाही.शौचालयातील दुधाच्या कॅनचे छायाचित्र प्रस्तुत प्रतिनिधीने काढले. ते पाहिल्यानंतरही एकही अधिकारी त्यावर बोलायला तयार नाही. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातून नागपूरसाठी दररोज १५ ते २० हजार लीटर दुधाचा पुरवठा केला जातो. गोंदिया, तिरोडा, तुमसर, वरठी स्थानकांहून दूध घेतले जाते. व्यावसायिक कोणत्याही डब्यात चढतात. जागा दिसेल तेथे दुधाचे कॅन ठेवण्यात येतात. प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, म्हणून काही जण चक्क शौचालयात दुधाचे कॅन ठेवतात. प्रस्तुत प्रतिनिधीने शौचालयात जाऊन बघितले असता, दुधाचे दोन कॅन आढळले. २००५ मध्ये भंडाऱ्याचे तत्कालीन खा. शिशुपाल पटले यांच्या मागणीवरून रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र एक्स्पे्रसला दुधाची वाहतूक करण्यासाठी एक विशेष डबा जोडला आहे. आजही तो कायम आहे. मात्र, जागेनुसार आरक्षित डब्यात दुधाचे कॅन ठेवले जातात.दुधाची वाहतूक करण्यासाठी एक डबा पुरेसा नसून, अजून एका डब्याची आवश्यकता आहे. आरक्षित डब्यातून दुधाची वाहतूक करणे हे नियमाचे उल्लंघन आहे, असे एका व्यावसायिकानेही मान्य केले.