शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

वाहतूक पोलिसावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 02:13 IST

विना हेल्मेट प्रवास करत असताना अडविल्याच्या रागातून दुचाकीस्वारांनी वाहतूक पोलीस विलास शिंदेवर प्राणघातक हल्ला चढविला.

मुंबई : विना हेल्मेट प्रवास करत असताना अडविल्याच्या रागातून दुचाकीस्वारांनी वाहतूक पोलीस विलास शिंदेवर प्राणघातक हल्ला चढविला. शिंदे यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर लिलावती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खार पोलिसांनी दोन तरुणांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, १७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिंदे यांची बुधवारी भेट घेतली.मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात कार्यरत असलेले विलास शिंदे हे मंगळवारी दुपारी खारमधील एस.व्ही. रोडवर कर्तव्य बजावत होते. दुपारी तीनच्या सुमारास विनाहेल्मेट भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराला त्यांनी अडविले. शिंदे यांनी या तरुणांकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रे नसल्याने त्या तरुणांनी शिंदे यांच्याशी हुज्जत घालत त्यांना लाकडी बांबूने मारहाण करण्यास सुरुवात केली. बांबूचा जोराचा फटका डोक्यात बसल्याने शिंदे रक्तबंबाळ होऊन रस्त्यात कोसळले. शिंंदे यांच्यावर हल्ला झाल्याचे लक्षात येताच, अन्य पोलीस कर्मचारी त्यांच्या मदतीसाठी धावले. ही संधी साधून दोन्ही तरुणांनी तेथून पळ काढला. जखमी अवस्थेतील शिंदे यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करून खार पोलिसांनी हल्लेखोर तरुणांचा शोध सुरू केला.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे १७ वर्षीय तरुणाला अटक करण्यात पोलिसांना यश आले, तर या तरुणाचा २० वर्षीय भाऊ अहमद कुरेशी हा पसार असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. समाजसेवक असलेल्या त्याच्या आईकडेदेखील पोलीस चौकशी करत आहेत. (प्रतिनिधी)>सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे १७ वर्षीय तरुणाला अटक करण्यात पोलिसांना यश आले, तर या तरुणाचा २० वर्षीय भाऊ अहमद कुरेशी हा फरारी आहे.>२०१६ मध्ये झालेले हल्ले८ आॅगस्ट - सांताक्रुझ वाहतूक पोलीस शाखेच्या संजय हळके या कर्मचाऱ्याला मारहाण झाली. पोलिसांनी जगदीश शर्मा (३३) आणि राजेश राय (२५) या दोघा वाहन चालकांना अटक करण्यात आली. ७ एप्रिल - विलेपार्ले वाहतूक शाखेमध्ये कार्यरत अमुकसिद्ध धुलप्पा करपे या हेड कॉन्स्टेबलने कार चालकाला लायसेन्स आणि गाडीची कागदपत्रे दाखविण्यास सांगितली. कागदपत्रे दाखविण्यास विरोध करपे यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी जिमित वडेरा आणि मयांक ठक्कर या दोघांना अटक केली.२५ फेब्रुवारी - गोरेगाव वाहतूक शाखेत कार्यरत असलेले दत्ताराम घुगे यांच्यावर गोरेगावच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील बिंबीसार परिसरात हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी ट्रक चालक मोहम्मद उस्मान कमरुल हक आणि ट्रक क्लीनर अहमदअली मोहम्मद आमीन यांना वनराई पोलिसांनी अटक केली. ५ मार्च - डी एन नगर वाहतूक शाखेत काम करणाऱ्या संजय नवले यांच्यावर आयओसी जंक्शनजवळ विकी साळवे आणि शाम बनसोडे या मोटरसायकलस्वारांनी हल्ला केला होता. याप्रकरणी डी एन नगर पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. २५ मार्च - जे.जे ब्रिजवर मोटर सायकल चालविण्यास बंदी असताना देखील याठिकाणी मोटरसायकल चालावीणाऱ्या अहमद अन्सारी आणि मेवियन अन्सारी यांनी पायधुनी वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई अमोल गवाणकर यांना मारहाण केली होती. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी या दोघांना अटक केली होती.१४ मार्च - दक्षिण मुंबईतील नागपाडा वाहतूक शाखेच्या एका महिला पोलिसाला अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकावीणाऱ्याचा प्रकार महालक्ष्मी जंक्शनकडे घडला होता. याप्रकरणी मयुर जेधे या तरुणाला अटक करण्यात आली होती.