ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. १० - रविवारच्या सुट्टीमुळे आज सकाळ पासूनच लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी झाल्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा लांबपर्यत रांगा लागल्या आहेत.
भूशी धरणाकडे जाणारा मार्ग सकाळीच हाऊसफुल झाल्याने धरणाकडे जाणारा मार्ग आज लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. वाहतुक नियोजनासाठी जवळपास १०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.