शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूकदारांचे चक्काजाम आंदोलन मागे; इंधन दरवाढ, जीएसटीवर केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 04:19 IST

जीएसटीतील जाचक अटी आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर दोन दिवस चक्काजाम आंदोलन केल्यानंतर, मंगळवारी पेट्रोलियम मंत्रालय आणि रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालयाच्या सहसचिवांनी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या

मुंबई : जीएसटीतील जाचक अटी आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर दोन दिवस चक्काजाम आंदोलन केल्यानंतर, मंगळवारी पेट्रोलियम मंत्रालय आणि रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालयाच्या सहसचिवांनी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या (एआयएमटीसी) शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविले. या वेळी सकारात्मक चर्चा झाल्याने, सायंकाळी ८ वाजता चक्काजाम आंदोलन मागे घेतल्याची माहिती बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सचिव जितेंद्र पारिख यांनी दिली.केंद्र सरकारसोबत चर्चेस उपस्थित असलेल्या एआयएमटीसीच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मल्कित सिंग यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालयासोबत मागण्यांवर सविस्तर चर्चा होईल. मंगळवारच्या बैठकीत पेट्रोलियम आणि रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या सहसचिवांनी वाहतूकदारांचे प्रश्न ऐकून घेतले. त्यात पेट्रोलियम मंत्रालयाचे सहसचिव आशुतोष जिंदल यांनी इंधन दरवाढीसंदर्भात वित्त विभागासोबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. देशात एकच इंधन दर आणि इंधनांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत शासन विचाराधीन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जीएसटीबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य महेंद्रकुमार यांनी दिले आहे.परिणामी, दिवाळीपर्यंत मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे कोअर कमिटीने ठरविले आहे. दिवाळीपर्यंत खूशखबर देण्याचे सहसचिवांनी आश्वासित केले आहे. दरम्यान, वाहतूकदारांच्या दोन दिवसीय चक्काजाम आंदोलनामुळे, ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.

टॅग्स :Chakka jamचक्काजाम