शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूकदारांचा ८ मार्च रोजी संप

By admin | Updated: February 28, 2016 02:12 IST

राज्य सरकारने परवाना शुल्कात केलेल्या भरमसाठ वाढीला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, बस, टँकर वाहतूक महासंघाने ८ मार्च रोजी एक दिवसीय संप पुकारला आहे.

मुंबई : राज्य सरकारने परवाना शुल्कात केलेल्या भरमसाठ वाढीला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, बस, टँकर वाहतूक महासंघाने ८ मार्च रोजी एक दिवसीय संप पुकारला आहे. परवाना शुल्काव्यतिरिक्त सरकारने मोटार वाहन कायद्यात सुधारणा करून, घातलेल्या जाचक अटीलाही महासंघाने विरोध दर्शवला आहे. या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांबाबत सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास, १५ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महासंघाचे अध्यक्ष प्रसन्ना पटवर्धन यांनी दिला आहे. राज्य सरकारने परवाना शुल्कामध्ये वाढ केल्याने, राज्यातील पर्यटन व्यवसाय खिळखिळा होण्याची भीती महासंघाचे अध्यक्ष पटवर्धन यांनी व्यक्त केली. सरकारचा हा निर्णय घातकी असल्याने महासंघाने संप पुकारल्याची माहिती पटवर्धन यांनी दिली. शनिवारी या संदर्भात वाशी येथे महासंघाची बैठक झाली.या महासंघटनेमध्ये मुंबई बस मालकसह राज्यातील २३४ संघटनांचा समावेश असल्याने, ८ मार्च रोजी राज्यभरातील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. या संपामध्ये मुंबईतील सर्व रूटवरील बस, स्कूल बस, पॅकेज बसही सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघटनेचे मुराद नाईल, के. व्ही. शेट्टी, मलिक पटेल यांनी दिली. परवाना शुल्क वाढ कमी करण्यात यावी, खासगी बस व इतर वाहनांसाठी पार्किंगची जागा उपलब्ध करून देणे, तिप्पट प्रवासी कर मागे घ्यावा, खासगी बसेसचे तिकीट बुकिंग काउंटर पुन्हा सुरू करणे, राज्यात एसटीच्या १८ हजार बसेस आहेत, तर खासगी बसेस अडीच लाख आहेत, त्यामुळे खासगी बसेसना त्रास देणे बंद करावे इत्यादी मागण्यांसाठी हा संप पुकारला जात आहे. (प्रतिनिधी).... तर रिक्षाचालकांचे आंदोलनलॉटरीमध्ये विजेते ठरलेल्या रिक्षा चालकांच्या मराठीच्या चाचणीला मुंबई आॅटोरिक्षा मेन्स संघटनेने आक्षेप घेतला आहे. ही अट रद्द करण्यात आली नाही, तर सोमवारपासून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष शंशाक राव यांनी दिला आहे. या संदर्भात परिवहन आयुक्त श्याम वर्धने यांना निवेदन देण्यात आले असून, परिवहन मंत्र्यांसोबत बैठक घेत निर्णय बदलण्यात यावा, अशी मागणी संघटनेकडून केली आहे.आता परवान्यासाठी लॉटरी काढल्यानंतर विजेत्या रिक्षाचालकांची मराठी वाचनाची चाचणी घेण्याचा निर्णय चुकीचा आहे. रिक्षा चालकांचे शिक्षण कमी असल्याने, सरकार आणि परिवहन विभागाने याची जबरदस्ती करू नये. महत्त्वाचे म्हणजे, अमराठी रिक्षा चालकांना परवाना न देण्याचा सरकारचा हा छुपा प्रयत्न आहे. परिणामी, सरकारचा हा कट शिजू देणार नाही, असे शशांक राव यांनी सांगितले.