शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

By admin | Updated: August 3, 2016 02:11 IST

खड्ड्यामुळे अरुणकुमार वैद्य मार्गावरील ओबेरॉय मॉल जंक्शन ते नागरी निवारा येथील सारस्वत बँक जंक्शनपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत

मनोहर कुंभेजकर,

मुंबई- गोरेगाव पूर्वेकडील पश्चिम द्रुुतगती महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे अरुणकुमार वैद्य मार्गावरील ओबेरॉय मॉल जंक्शन ते नागरी निवारा येथील सारस्वत बँक जंक्शनपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. येथील वाहतूककोंडीने वाहनचालक आणि नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा की महापालिकेचा? या वादात तक्रार नक्की कोणाकडे करायची? असा सवाल नागरिकांनी केला आहे.दिंडोशी उड्डाणपुलापासून आरे चेक नाका आणि ओबेरॉय मॉल जंक्शन ते आयटी पार्क येथील गर्दीच्या रस्त्यावर ओबेरॉय मॉल जंक्शन, रत्नागिरी हॉटेल जंक्शन, नागरी निवारा येथील सारस्वत बँक जंक्शन येथे खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. शिवाय वाहतूककोंडीत भर पडत असल्याने वेळही वाया जात आहे. रस्त्यावर टाकलेली खडी आणि पेव्हर ब्लॉक उखडल्याने समस्येत भरच पडली आहे. आयटी पार्क येथे दररोज सुमारे शेकडोहून अधिक खासगी बस आणि रिक्षा ये-जा करतात. येथे वाहतुकीची वर्दळ असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. या समस्येकडे महापालिकेच्या पी/दक्षिण, पी (उत्तर) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचे रिक्षाचालकांसह वाहनचालकांनी सांगितले.>दिंडोशी आगारातून मुंबई, नवी मुंबई, मुलुंड, भार्इंदर या विविध ठिकाणी अनेक बस पहाटे ते मध्यरात्रीपर्यंत ये-जा करतात. मात्र खड्ड्यामुळे प्रवासाला वेळ लागतो. शिवाय ओबेरॉय ते कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्स या प्रवासासाठीही विलंब लागत असल्याचे अमेय जेऊरकर या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने सांगितले.महापालिकेच्या पी(उत्तर) विभागाच्या साहाय्यक पालिका आयुक्त संगीता हसनाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाल्या नाहीत.>मागील काही दिवसांपासून पावसाचा जोरदार मारा सुरू आहे. त्यामुळे येथे खड्डे पडले आहेत. याप्रकरणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधला होता. शिवाय येथील खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. ओबेरॉय मॉल जंक्शन ते आरे चेक नाका येथील खड्डे सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने बुजवावेत, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्याकडे केली आहे.- सुनील प्रभू, आमदार