शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

‘पर्ससीन’मुळे पारंपरिक मच्छिमार मेटाकुटीस

By admin | Updated: November 27, 2014 00:12 IST

नौका पकडल्या : रापणकर संघाकडून विचारणा

मालवण : किनाऱ्यानजीक अनधिकृतरीत्या मासेमारी करणाऱ्या कोचरे-निवती येथील दोन मिनी पर्ससीन नौकांना देवबाग येथील रापणकर संघाच्या मच्छिमारांनी पकडून किनाऱ्यावर आणले. ही घटना आज, बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. स्थानिक रापण संघाच्या मच्छिमारांना मत्स्य दुष्काळाचा फटका बसत असतानाच पर्ससीन नौकांच्या अतिक्रमणाने पारंपरिक मच्छिमार मेटाकुटीस आले आहेत. याच रागातून पकडून आणलेल्या नौकांच्या मालकांना याचा जाब विचारण्यात आला. यामुळे काहीकाळ देवबाग किनाऱ्यावर वादाची परिस्थिती निर्माण झाली होती.याबाबतची अधिक माहिती अशी की, आज दुपारपासून देवबाग समुद्रकिनाऱ्यानजीक १० ते १५ मिनी पर्ससीन नौका मासेमारी करीत होत्या. मासेमारी करीत असतानाच त्यांनी देवबाग किनाऱ्यानजीक अतिक्रमण केल्याने स्थानिक रापणकर मच्छिमार किनाऱ्यावर जमा झाले. पारंपरिक मच्छिमारांच्या तोंडचा घास हिरावून नेणाऱ्या पर्ससीन नौकांवर कारवाई झालीच पाहिजे. त्यांना जरब बसावी, या उद्देशाने पारंपरिक रापण संघाच्या मच्छिमारांनी त्यांचा समुद्रात पाठलाग केला.समुद्रात झालेल्या धरपकडीत कोचरे निवती येथील दोन मिनी पर्ससीन नौकांना पकडण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले. यावेळी झालेल्या पाठलागात अन्य पर्ससीन नौका पळून जाण्यात यशस्वी झाल्या.पर्ससीन नौकांना पकडून किनाऱ्यावर आणल्यानंतर त्याठिकाणी बांदेकर रापण संघ, राऊळ रापण संघ, कासवकर रापण संघ व सीमाव रापण संघाचे मच्छिमार, तसेच दांडी येथील मच्छिमार मोठ्या संख्येने जमा झाले होते. पकडून आणलेल्या मच्छिमारांवर कोणती कारवाई करावी, याबाबत उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. या दरम्यान संतापलेल्या मच्छिमारांनी आर-पारचा लढा जवळ आल्याचे सांगत नौकांच्या मालकांना जाब विचारला.यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मच्छिमारांना शांत राहण्याचे आवाहन केले. आपापसांतील वाद सामंजस्याने मिटवा. कायदा व सुव्यवस्था बिघडवू देऊ नका; अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल, अशा सूचना पोलिसांनी केल्या. (प्रतिनिधी)वाद उफाळणारदिवसाढवळ्या किनाऱ्यानजीक येऊन मासेमारी करणाऱ्या मिनी पर्ससीन नौकांवर शासन कोणतीच कारवाई करत नसल्यामुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. याचेच पर्यवसान आजच्या धरपकडीत झाले.