शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘वीर’ बसविण्याची परंपरा कायम

By admin | Updated: January 16, 2017 18:16 IST

शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरात मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ‘वीर’ व ‘वडद्ख्खीन’ बसविण्याचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 16 - शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरात मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ‘वीर’ व ‘वडद्ख्खीन’ बसविण्याचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गावातून निघालेल्या मिरवणुकीने येथील ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. मकर संक्रांत व अक्षय्यतृतीया नंतर येणाऱ्या दिवसाला कर व ताडापुरण अशी म्हणण्याची पूर्वापार परंपरा येथे आहे. या दिवशी ग्रामीण भागात पुरुष जर अपघाताने मृत्यू पावला असेल तर त्यांच्या आठवणीनिमित्त व कुटुंबाला दोष लागू नये म्हणून वीर बसवणे व आधी वीर बसवला असेल तर दर ४, ५ वर्षाच्या अंतराने त्याला उजविणे अशी पारंपारिक पद्धत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. यंदाही त्याच पद्धतीने गावातून मिरवणूक काढण्यात आली. याच पद्धतीने स्त्री देखील अपघाती निधन होवून मरण पावली असेल तर ‘वडद्ख्खीन’ बसविणे हा कार्यक्रम होताना दिसून येतो. कर, ताडापुरण वीर, वडद्ख्खीन हे अहिराणी भाषेतील परिचित शब्द आहेत आणि याविषयी ग्रामीण भागात त्यांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे या होणाऱ्या कार्यक्रमातून दिसून येत होते. मिरवणुकीने वेधले ग्रामस्थांचे लक्ष यानिमित्ताने मालपूर गावातून पाषाणाच्या मूर्तीची सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. ठरलेल्या ठिकाणी भगत व त्यांचे वाजंत्रीधारक ‘डांक्या’ यांच्या मार्गदर्शनानुसार विधीवत स्थापना करुन पुरणपोळीचे नैवेद्यही दाखविण्यात आला. नृत्याविष्काराने ग्रामस्थांचे मनोरंजन शोभायात्रेला सुरुवात झाल्यानंतर पुरुषांनी अंगावर साडीचे पट्टा त्रिकोणी बांधून कंबरेला नंदीबैलाची गेज बांधला होता. तसेच अंगाला, कपाळाला कुंकवाचा मोठा ठसा व हातात काठी व त्या काठीच्या टोकाला लिंबू लावून केलेल्या पेहराव यांना ‘वीर’ शोभायात्रेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारामुळे उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले.