शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीबाबत व्यापारीही गोंधळलेले

By admin | Updated: July 2, 2017 05:02 IST

शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून देशात लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) मोठ्या उत्साहात स्वागत होत असले, तरी त्याबाबतच्या प्रत्यक्षातील

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून देशात लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) मोठ्या उत्साहात स्वागत होत असले, तरी त्याबाबतच्या प्रत्यक्षातील व्यवहारांची नेमकी स्पष्टता नसल्याने, पहिला दिवस गोंधळलेल्या अवस्थेतच गेला. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच व्यावसायिक, व्यापारी, दुकानदारांमध्येही त्याबाबत संभ्रमावस्था कायम होती. दैनंदिन खरेदी-विक्रीचे काही प्रमाणात व्यवहार झाले असले, तरी नवी करप्रणाली समजण्यामध्ये गोंधळ उडत होता. सर्व व्यवहार सुरळीतपणे पार पडण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागेल, असे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले. शुक्रवारी रात्रीपर्यंत झुंबड असलेली इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने, अन्य दुकाने, मॉल शनिवारी मात्र ओस पडले होते. सोन्याच्या दुकानांमध्येही गर्दी नव्हती. मेडिकल्समध्ये बिल देताना गोंधळ उडत होता. काही औषधे स्वस्त, तर काही महाग झाल्याने, विक्रेते बिल बनविताना गोंधळलेले होते. याबाबत उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करण्यात येत असल्याचे केमिस्ट असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले. जीएसटी लागू झाल्यावर कोणत्या वस्तू महागणार, कोणत्या स्वस्त होणार, याविषयी प्रसिद्धीमाध्यमातून काही माहिती मिळाली होती, पण प्रत्यक्षात तसेच आहे  की नाही, हे माहीत नाही, अशी  अनेकांची प्रतिक्रिया होती. त्यामुळे अंदाज घेण्यासाठी पहिल्या दिवशी खरेदी न केल्याचे दिसून आले. शिवसेनेचा टोलाशिवसेनेने जीएसटीला पाठिंबा दिला आहे. मात्र, या करप्रणालीमुळे मुंबई महापालिकेतील जकातीवर मोठा परिणाम होणार असल्याने, त्याबद्दल काहीसा राग कायम असल्याचे शनिवारी त्यांनी दिलेल्या निवेदनातून स्पष्ट झाले. मुंबईच्या जकात चौक्या आणि पोलीस हटविल्याने, मुंबईला सुरक्षेचे भगदाड पडले आहे. परिणामी, घातपात तर घडणार नाही ना? अशी चिंता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. जीएसटीची मिठाई भरवणाऱ्यांनो, काळजी घ्या. जल्लोष सुरू असताना, मुंबईत एखादा ‘कसाब’ राजरोस घुसू नये, यासाठी शिवसेना सरकारला सावध करत आहे, असे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.