शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मद्य, मद्यार्काच्या शोधासाठी ‘ट्रॅक अ‍ॅण्ड ट्रेस’ प्रकल्प

By admin | Updated: January 25, 2017 03:48 IST

देशी-विदेशी मद्य व मद्यार्काच्या राज्यात अवैधपणे होत असलेल्या तस्करीला आळा घालण्यासाठी आता त्या वाहनांचा शोध घेण्यासाठी जीपीएस ‘ट्रॅक अ‍ॅण्ड ट्रेस’ प्रकल्प राबविला जाणार आहे.

जमीर काझी / मुंबईदेशी-विदेशी मद्य व मद्यार्काच्या राज्यात अवैधपणे होत असलेल्या तस्करीला आळा घालण्यासाठी आता त्या वाहनांचा शोध घेण्यासाठी जीपीएस ‘ट्रॅक अ‍ॅण्ड ट्रेस’ प्रकल्प राबविला जाणार आहे. त्याद्वारे दारूची वाहतूक करणाऱ्या संबंधित वाहनांची इत्थंभूत माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या कंट्रोलरूममध्ये आपसूक पोहोचणार आहे.‘ट्रॅक अ‍ॅण्ड ट्रेस’ हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारने उत्पादन शुल्क आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञाची समिती निवडली आहे. हे सॉफ्टवेअर कार्यान्वित झाल्यास रोज जकात चुकवून होत असलेल्या लाखो रुपये किमतीच्या मद्याबाबत माहिती मिळणार आहे. त्यामुळे विभागाच्या महसुलात मोठी वाढ होणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्याच्या महसुलावर परिणाम करणारा मोठा विभाग आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून अवैद्य मद्य व मद्यार्काची वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचा मोठा फटका महसुलावर होत असल्याचे विभागाने केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला प्रतिबंध घालण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जाऊनही फारसा फरक पडत नसल्याने आयुक्त व्ही. राधा यांनी अशा वाहनांचा ‘ट्रॅक अ‍ॅण्ड ट्रेस’ लावणारे सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून त्याद्वारे मद्य व मद्यार्काची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांची माहिती तत्काळ उत्पादन शुल्काच्या संबंधित अधीक्षक कार्यालयाच्या कंट्रोलरूमला मिळेल. त्यानंतर भरारी पथकाकडून त्या ठिकाणी जाऊन कार्यवाही केली जाईल. हे सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाच तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे.