शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
2
पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी
3
इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
4
टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमात मोठा बदल! एन चंद्रशेखरन करणार हॅट्ट्रिक
5
Video - टीम जिंकली पण 'तो' हरला, क्रिकेटर मैदानावरच कोसळला, शेवटचा बॉल टाकला अन्...
6
Success Story: झोमॅटो डिलिव्हरी बॉयनं 'कार्ट' पासून बनवला ब्रँड, आता वार्षिक ४० लाखांची उलाढाल, लोक विचारताहेत, 'कसं केलं?'
7
Ambadas Danve : "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी
8
रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार
9
"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
10
मुक्काम पोस्ट महामुंबई : धनुष्यबाण कोणाचा? याचा निकाल भाजपला महाराष्ट्रात नेमके काय हवे आहे, हे सांगणारा असेल
11
मला जाऊ द्या ना दुकानी, आता वाजले की बारा...
12
१००% पैसे होणार डबल! पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये ₹२५,००० ची गुंतवणूक देईल लाखोंचा रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
13
"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय
14
सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार....
15
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
16
मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्याचं हास्यजत्रेशी आहे खास कनेक्शन!
17
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
18
व्हॉट्‌सॲपची ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग पडली महागात; क्षणात पावणेपाच लाख झाले गायब
19
‘आयटीआर’मधील चलाखी; गुरुजी ‘आयकर’च्या रडारवर
20
राज ठाकरे सहकुटुंब पोहचले मातोश्रीवर; चर्चा राजकीय? निमित्त स्नेहभोजनाचे, तीन महिन्यात दोघांची सातवी भेट 

टोइंग व्हॅनवरील गुंडांची दहशत

By admin | Updated: October 17, 2016 02:25 IST

पनवेलमध्ये टोइंग व्हॅनवरील कंत्राटी कामगारांनी मारहाण केल्यामुळे रामभाऊ पाईकराव या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला

नामदेव मोरे,

नवी मुंबई- पनवेलमध्ये टोइंग व्हॅनवरील कंत्राटी कामगारांनी मारहाण केल्यामुळे रामभाऊ पाईकराव या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला आहे. वाहतूक पोलिसांच्या नावाचा गैरवापर करून हे कामगार गुंडगिरी करत असल्याचे निदर्शनास आले असून, बिनधास्तपणे उघड्यावर मद्यपान करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये वाहतूक पोलिसांनी खाजगी ठेकेदाराकडून टोइंग व्हॅन भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. टोइंग व्हॅनच्या सहाय्याने वाहतुकीला अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे अपेक्षित असते. पण प्रत्यक्षात या मोहिमेला पूर्ण वेळ व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नो पार्किंगच्या नावाखाली दिवसभर मोटारसायकल उचलून दंडात्मक कारवाई केली जात आहे. टोइंग व्हॅनवर काम करणारे कर्मचारी नागरिकांशी उद्धटपणे वर्तन करतात. अनेक वेळा नागरिकांना मारहाणही करत असून त्यांच्या गुंडगिरीवर वाहतूक पोलिसांचे नियंत्रण राहिलेले नाही. दोन दिवसांपूर्वी पनवेल वाहतूक पोलिसांच्या ताफ्यातील टोइंग व्हॅनचे कर्मचारी उघड्यावर मद्यपान करत असल्याचे फोटो सोशल मीडियातून सर्वत्र व्हायरल झाले होते. शनिवारी टोइंग व्हॅनवरील एक कर्मचारी मैत्रिणीला घेवून सेक्टर १८ मधील पडक्या इमारतीमध्ये गेला होता. तेथील सुरक्षा रक्षक रामभाऊ पाईकराव यांनी त्यांना हटकले असता त्याला राग आला व त्यांनी सुरक्षारक्षकास धक्काबुक्की करण्यास सुरवात केली. पाईकराव याची पत्नी, मुलगीही घराबाहेर येवून त्यांनी त्या कर्मचाऱ्याला विरोध केला. यामुळे राग आलेला हा तरुण तेथून जावून मित्रांना घेवून आला व पाईकराव, त्यांची पत्नी व मुलगी यांना बेदम मारहाण केली. मारहाणीमध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तरुणांनी तेथून पळ काढला आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी विष्णू विभू विरगम्या, आसीफ सलीम शेख, धनराज उमेश कांबळे, सुनील विनोद चव्हाण व नीलेश मधू म्हस्के या पाच आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी पनवेलमधील लक्ष्मी नगर वसाहत झोपडपट्टी, पटेल मोहल्ला, नवनाथ नगर झोपडपट्टी, तक्का व आजवली गाव परिसरात राहणारे आहेत. वाहतूक पोलिसांच्या टोइंग व्हॅनवर रोजंदारीवर काम करत होते. पोलिसांच्या ताफ्यातील वाहनांवर काम करत असल्यामुळे त्यांची गुंडगिरी वाढू लागली होती. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षारक्षकाला व त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. >कर्र्तव्यदक्ष सुरक्षारक्षक पाईकराव हे कर्तव्यदक्ष सुरक्षारक्षक म्हणून परिचित होते. मुख्य आरोपी शनिवारी मैत्रिणीला घेवून पडक्या इमारतीमध्ये आला होता. त्याला इमारतीच्या आवारामध्ये बसण्यास मनाई केल्यामुळे त्याने पाईकराव यांना व त्यांच्या परिवारातील सदस्यांना मारहाण केली. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. >दिवाळीमध्ये होते मुलीचे लग्नसुरक्षा रक्षक पाईकराव यांच्या मुलीचे दिवाळीमध्ये लग्न होते. घरामध्ये लग्नाची तयारी सुरू असताना गुंडांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे त्यांच्या मुलीसह नातेवाइकांना शोक अनावर झाला. आमच्या वडिलांच्या मारेकऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी मुलीसह तिच्या परिवारातील सदस्यांनी केली आहे. >उघड्यावर मद्यपान टोइंग व्हॅनवरील तरुण चौकीजवळ मोटारसायकलवर बसून नियमितपणे मद्यपान करत असतात. पोलिसांच्या नावाखाली बिनधास्तपणे कायद्याचे उल्लंघन सुरू असल्याचे फोटो काही दक्ष नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी काढले होते. पोलिसांनी वेळेवर या तरुणांना आवर घातला असता तर शनिवारची दुर्घटना टळली असती असते, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे>चारित्र्य पडताळणी नाही शहरातील वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात असलेल्या टोइंग व्हॅनवर गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरूण नोकरी करू लागले आहेत. नो पार्किंगमध्ये उभी केलेली वाहने उचलताना हे कामगार नागरिकांना दमदाटी, शिवीगाळ व मारहाणही करतात. सोबत पोलीस असल्यामुळे या तरूणांची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत आहे.पोलिसांच्या ताफ्यातील वाहनांवर काम करणाऱ्या कामगारांची चारित्र्य पडताळणी करण्याची मागणी वारंवार होत असतानाही पोलीस प्रशासन ही जबाबदारी ठेकेदारावर ढकलत असल्यानेच अशाप्रकारचे गुन्हे घडत आहेत.