शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राणीच्या बागेत पर्यटकांची रेकॉर्डब्रेक गर्दी, पार्किंग फुल्ल

By admin | Updated: May 21, 2017 16:16 IST

भायखळ्यात राणीच्या बागेत आज पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. तिकीट काढायची रांग उद्यानाबाहेरपर्यंत गेली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - भायखळ्यात राणीच्या बागेत आज पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. तिकीट काढायची रांग उद्यानाबाहेरपर्यंत गेली आहे. मोठ्या संख्येने खासगी वाहनांमधून आलेल्या पर्यटकांमुळे राणीबागेतील पार्किंग दुपारी दीड वाजताच बंद करावी लागली आहे.  
 
प्रवेशाचा मुख्य प्रवेशद्वार वाहनांसाठी बंद केल्याने खासगी वाहनचालकांची पुरती धांदल उडाली आहे. एरव्ही सार्वजनिक सुटी आणि शनिवार व रविवार असल्यास पार्किंग दुपारी ३ वाजता बंद केली जाते. मात्र, आज मोठ्या प्रमाणात उसळलेल्या गर्दीमुळे प्रशासनाने वाहनांसाठी प्रवेशद्वार बंद केले आहे. रविवारचा दिवस साधून पेंग्विन पाहात रविवारची सुटी सत्कारणी लावण्यासाठी हजारो पर्यटक राणीबागेत दाखल झाले आहेत. 
 
एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांना हाताळण्यासाठी महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांच्या मदतीला अनिरूद्ध अॅकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. तिकिटघराच्या तीन खिडक्या सुरू असतानाही पर्यटकांची रांग हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच आहे. दुचाकींसह चारचाकीमधून येणाऱ्या पर्यटकांमुळे प्रवेशद्वाराबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. परिणामी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
  दरम्यान,  राणीबागेचा मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याने प्रवेशद्वाराबाहेर लोकांनी गर्दी केली आहे. सोमवार ते शुक्रवार दरम्यान सायंकाळी ५ वाजेपर्यंत लोकांसाठी खुले असणारे उद्यान शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटी दिवशी दुपारी ३ वाजताच बंद केले जाते. या माहितीपासून अनभिज्ञ असलेले पर्यटक प्रवेशद्वाराबाहेर गोंधळ घातला. पर्यटकांची संख्या पाहून प्रशासनाने आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत पर्यटकांना प्रवेश दिला होता. मात्र तरीही पर्यटकांची संख्या कमी होत नसल्याने अखेर मुख्य प्रवेश द्वार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.