शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

खडवली नदीवर पर्यटकांच्या गर्दीला उधाण

By admin | Updated: April 27, 2016 03:17 IST

ठाणे, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, वासिंद येथून पर्यटकांनी खडवली नदीवरील पिकनिक पॉइंटवर गर्दी केली आहे.

टिटवाळा : महिनाभरापासून उन्हाची काहिली वाढल्याने त्यापासून दोन घटका सुटका व्हावी व मस्त डुंबण्याचा आनंद घेता यावा याकरिता ठाणे, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, वासिंद येथून पर्यटकांनी खडवली नदीवरील पिकनिक पॉइंटवर गर्दी केली आहे. त्यातच आता शाळा व महाविद्यालयांच्या सुट्या सुरू झाल्याने पर्यटकांच्या उत्साहाला भरते आले आहे.आबालवृद्धांचे समूह नदीच्या संथ वाहणाऱ्या पाण्यात पोहण्याचा मनमुराद आनंद घेत असल्याचे चित्र पाहायला मिळते. रविवार व सुटीच्या दिवशी तर नदीचा किनारा चौपाटीसारखा पर्यटकांनी भरून जातो. पर्यटकांची गर्दी होऊ लागल्याने आजूबाजूच्या धाब्यांवर घरगुती जेवणाकरिता अक्षरश: रांगा लागतात. ज्यांना नदीत पोहता येत नाही त्यांच्याकरिता हवा भरलेल्या रबरी ट्युब भाड्याने मिळतात. नदीच्या दोन्ही तीरांवर दोन अति महत्त्वाच्या वास्तू आहेत. त्यामधील एक स्वामी समर्थ मठ तर दुसरे मातोश्री वृध्दाश्रम हे आहे. पर्यटक आवर्जून तेथे भेटी देतात. >या ठिकाणी कसे जायचे ? या ठिकाणी मुंबईहून आसनगांव किंवा कसारा लोकल पकडून येता येते. टिटवाळानंतरचे स्थानक खडवली येथे उतरून चालत पाच मिनिटांत पिकनिक पॉइंटवर पोहोचता येते. तसेच मुंबई-नाशिक महामार्गाने पडघ्याजवळून फाटा फुटतोय तेथून वाहनाने खडवलीकडे येता येते.