शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

हुल्लडबाजांमुळे पर्यटकांचा हिरमोड

By admin | Updated: August 3, 2016 02:05 IST

लोणावळ्यातील मुसळधार पाऊस, दाट धुके, भुशी डॅम, तेथील उत्तुंग कडे, भन्नाट वारे, आकर्षित करणारी हिरवाई, पाण्याने तुडुंब भरलेली भातखाचरे, छोटे-मोठे धबधबे

वडगाव मावळ : मावळ तालुका म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात लोणावळ्यातील मुसळधार पाऊस, दाट धुके, भुशी डॅम, तेथील उत्तुंग कडे, भन्नाट वारे, आकर्षित करणारी हिरवाई, पाण्याने तुडुंब भरलेली भातखाचरे, छोटे-मोठे धबधबे. पण, आता लोणावळा आणि मावळातील इतर भागातील वातावरणाचा आनंद उपभोगताना अनेक पर्यटकांना हुल्लडबाजांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर-धबधब्यांमध्ये बसून मद्यपान करणे, धिंगाणा-गोंधळ घालणे, छेडछाड करणे, बेदरकार वाहन चालविणे, त्यातून होणारे अपघात अशा गोष्टींमुळे हे ठिकाण शांत, सुसंस्कृत पर्यटकांसाठी उपद्र्रव ठरत चालले आहे. वाहतुकीची कोंडी व सुरक्षितता हे मुद्देसुद्धा यामुळे ऐरणीवर आले आहेत. पावसाळी पर्यटन आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मावळला पसंती दिली जाते. येथील धो-धो पाऊस, जागोजागी निर्माण होणारे धबधबे, दाट धुके आणि हिरवाई यांमुळे या ठिकाणी पावसाळ्यात मोठी गर्दी होते. विशेषत: शनिवार, रविवार आणि इतर सुट्ट्यांच्या दिवशी या भागात अनेक जण हजेरी लावतात. यामध्ये कल्याण, ठाणे, मुंबई, पुणे येथून स्वत:ची वाहने घेऊन येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. पण, आता त्याचा ताबा विकृत पर्यटकांनी घेतला आहे. धांगडधिंगाच पाहायला मिळतो. यातील अनेक पर्यटक मद्यपान करणे, गुटखा, तंबाखू यांची नशा करणे, मोठ्या आवाजात गाणी वाजवणे असे प्रकार करतात. तसेच, मद्यपान केल्यानंतर तिथेच बाटल्या फोडणे, त्या पाण्यात टाकणे, विचित्र हावभाव करणे, अश्लील नाच करणे, अशा अनेक गोष्टींचा त्रास स्थानिकांना, निसर्गप्रेमींना, तसेच मुख्यत: कुटुंबासह फिरायला आलेल्या पर्यटकांना सहन करावा लागतो. >रोजगाराबरोबर त्रासही मिळालामद्यधुंद अवस्थेत पर्यटक वाहनांसमोर नाचत बसतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांची वाहने लवकर बाहेर पडत नाहीत. अनेकदा पर्यटक आणि वाहनचालक यांच्यात भांडणे होतात. मावळात येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला, पण त्यांचा त्रासही मोठा आहे. मद्यधुंद अवस्थेतील तरुण-तरुणींचा नाच, धांगडधिंगा न पाहण्याजोगा असतो. वाहनांची बेशिस्त, तरुणांची अरेरावी मावळातील नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे अशा हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.हुल्लडबाजी करीत वाहन चालवत असताना वडेश्वर गु्रप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच मधुकर मोरमारे यांना वाहनाचा धक्का लागला. त्यामुळे त्यांची पर्यटकांसोबत बाचाबाची झाली. याचा राग मनात धरून पर्यटकांनी त्यांना मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.