शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘गाढेश्वर’कडे पर्यटकांची गर्दी

By admin | Updated: June 30, 2016 02:56 IST

सध्या पावसाळ्याचे दिवस असून पनवेल तालुक्यातील गाढेश्वर धरण व मोरबे धरणाकडे जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.

मयूर तांबडे,

पनवेल- सध्या पावसाळ्याचे दिवस असून पनवेल तालुक्यातील गाढेश्वर धरण व मोरबे धरणाकडे जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच शनिवार आणि रविवार सुटीचा वार म्हटला की हजारोंच्या संख्येने पर्यटक या धरणांत मौजमजा करण्यासाठी येतात. या ठिकाणी मद्य प्राशन करून पाण्यात पोहोण्यासाठी जातात. मात्र येथील पाण्याचा अंदाज न आल्याने गेल्या काही वर्षापूर्वी अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र या वर्षी गाढेश्वर धरणावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.पावसाळा सुरू झाला की, पर्यटकांना ओढ लागते ती पावसाळी सहलींची. वीकएण्ड अथवा एकदिवसीय सहलींसाठी पनवेल तालुक्यातील गाढेश्वर धरण उत्तम पर्याय आहे. पनवेलपासून १६ कि.मी. अंतरावर असलेल्या माथेरानच्या पायथ्याशी पनवेल नगरपालिकेच्या मालकीचे हे धरण आहे. निसर्गाचे सान्निध्य, हिरवाई, चारही बाजूने डोंगराच्या रांगा, त्यामध्ये धरणातून धबधब्यासारखे पडणारे पाणी यामुळे पर्यटक धरणाकडे अधिक आकर्षक होतात. मात्र या वर्षी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्यामुळे पर्यटकांना धरणात उतरता येणार नाही असे तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी सांगितले. धरणावर बांधलेला बंधारा जमिनीपासून दहा पंधरा फुट आहे. त्यामुळे धरणातील पाणी पाहिल्यावर पर्यटकांना पाण्यात जाण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. २६ जून रोजी धरणात पाणी नव्हते तरी देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक धरणावर मौज मजा करण्यासाठी आले होते. धरणाच्या परिसरात दरवर्षी अपघाताच्या घटना घडून जीव गमवावा लागतो. त्यामुळे या वर्षी तालुका पोलीस ठाण्यातील पोलिस चोख बंदोबस्त ठेवणार आहेत. दर शनिवार आणि रविवारी गाढेश्वर धरण परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १४ पोलीस कर्मचारी तसेच २ पोलीस अधिकारी नेमण्यात येणार असल्याचे वपोनी मालोजी शिंदे यांनी सांगितले.पर्यटक आपल्या कुटुंबासह या परिसरात येत असतात. मात्र मद्याच्या नशेत पावसाचा आनंद घेत काही जण खोल पाण्यात जातात. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पात्रात तोल जाऊन अनेक जण वाहून गेले आहेत. त्यामुळे पनवेल नगर पालिकेने प्रवेशबंदी केली आहे. पोहता येणारे चार कर्मचारीधरणावर ठेवण्यात येणाऱ्या पोलिसांमध्ये ४ कर्मचारी चांगल्यापैकी पोहणारे असणार आहेत. पनवेल नगरपालिकेने देखील धरणावर सुरक्षा रक्षक नेमले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत लागणारी साहित्य सामग्री देण्यात येणार आहे. गाढेश्वर धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नेरे गावाजवळ असलेली पोलीस चौकी, गाढेश्वर मंदिर आणि धरणाजवळ पोलीस असणार आहेत. जेणेकरून मद्यपान केले जाणार नाही व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. काही वेळेला मद्यपान केल्यामुळे शिवीगाळ, भांडणापर्यंत यांची मजल जाते.त्यामुळे धरणावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.