ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 22 - मागील आठवडा भरापासून लोणावळा परिसरात झालेल्या जोरदार पावसाचा जोर काल रात्रीपासून प्रचंड वाढल्याने भुशी धरणाचा परिसर, सहाराकडे जाणारा रस्ता व पार्किंग सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना पुर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
लोणावळ्यात मागील 24 तासात 220 मिमी पाऊस झाला. रात्री पासून लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. लोणावळ्यातील मावळा पुतळा चौक, गुरुद्वारा चौक, भांगरवाडी, नांगरगाव, तुंगार्ली परिसरात रस्त्यावर जवळपास दिड ते दोन फुट पाणी साचल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे. इंद्रायणी नदीला सदापुर, वाकसई, डोंगरगाव, कार्ला, मळवली, कामशेत परिसरात पुल आला असून सांगिसे पुल पाण्याखाली गेल्याने आठ गावांचा संपर्क तुटला आहे.
आणखी वाचा
लोणावळा परिसरात अतिवृष्टीसोबतच शनिवारची सुट्टी एन्जाँय करण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने वाहतुकीचा देखिल बोजवारा उडाला असून वाहतुक नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त नेमण्यात आला आहे.