नांदगाव/मुरुड : मुरुड तालुक्यातील आंबोली धरणावर पर्यटकांना बंदी घातल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. शनिवार व रविवार येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी असायची. संपूर्ण रायगडसह मुंबई, ठाणे व इतर भागांतून पर्यटकांचे लोंढे येत असत. परंतु जलसंपदा विभागाने सुरक्षिततेच्या कारणावरून येथे बंदी घातली असून, मज्जाव करण्यात आला आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असत व काही मद्यप्रेमीही आपला कार्यभार आटोपून रिकाम्या काचेच्या बाटल्या तिथेच टाकून किंवा फोडून कचरा करीत असत. तसेच अनेक जण भोजनासाठी आणलेल्या पत्रावळ्या, प्लास्टिक ग्लास, कागद ,भोजन करून उरलेले उष्टे अन्न असा कचरा तेथेच टाकून जात असत. यामुळे नाहक जलसंपदा विभागाला ही कटकट सहन करावी लागत असल्याने अखेर त्यांनी अंतिम निर्णय घेत पर्यटक व स्थानिक नागरिकांना मज्जाव केला आहे. तसेच या धरणातील पाणी मुरु ड शहर व अन्य भागात पिण्यासाठी वापरले जाते. अशा सर्व घटनांचा सारासार विचार करीत ही बंदी टाकण्यात आल्याचे विश्वसनीयरीत्या कळते.जलसंपदा विभागाने स्थानिकांना रोजगार द्यावा. आंबोली धरणावर बंदी केल्याने स्थानिक नागरिकांनी सुद्धा नाराजी व्यक्त करून लवकरच एक शिष्टमंडळ आमदार पंडित पाटील यांची भेट घेऊन कैफियत मांडणार आहे. (वार्ताहर)पर्यटकांचा हिरमोडपर्यटक हे ओव्हर फ्लो पाणी वाहत जाते तिथेच आंघोळ करीत असतात. आमच्यापासून पिण्याच्या पाण्याला कोणताही धोका नसताना हा निर्णय घेऊन आम्हाला दुखी केल्याच्या भावना अनेक पर्यटकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. अनेक जण नाराज होऊन परतत आहेत.>जलसंपदा विभागाने घेतलेला हा निर्णय दुर्दैवी आहे. जर स्वच्छतेचे कारण असेल तर आम्हाला हा ठेका मिळावा. ग्रामपंचायत पर्यटकांसाठी सुविधा देण्यास तयार आहे. त्यांच्या या कृतीमुळे पर्यटकांची संख्या कमी होऊन स्थानिक नागरिक जे स्वयंरोजगार करतात त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न गहन होणार - मनोज कमाने, सरपंच
मुरुड तालुक्यातील आंबोली धरणावर पर्यटकांना बंदी
By admin | Updated: August 1, 2016 02:49 IST