शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनस्थळी हुल्लडबाजी

By admin | Updated: June 28, 2016 01:56 IST

पावसाला सुरुवात झाल्याने कार्ला, भाजे, वेहेरगाव या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.

कार्ला : पावसाला सुरुवात झाल्याने कार्ला, भाजे, वेहेरगाव या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. काही मद्यपी, हुल्लडबाज पर्यटकांचा इतर पर्यटक आणि स्थानिकांना उपद्रव होत आहे. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी पर्यटनस्थळांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी होत आहे.यापुढचे दोन-तीन महिने विशेषत: शनिवार आणि रविवारी पर्यटकांची गर्दी पावसाळी पर्यटनासाठी होणार आहे. कार्ला, वेहेरगाव येथे काहीजण मुक्कामी येत असतात. मद्यपान, वाद्य वाजवणे, वेडेवाकडे नाचणे, रस्त्यातच वाहन उभे करून वाहनातील स्पीकरवर गाणी लावून नाचणे, रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या ओढे-नाल्यामध्ये अश्लीलपणे नाचणे, दारूच्या नशेत आपापसात किंवा दुसरे पर्यटक, स्थानिक नागरिक किंवा दुकानदार यांच्याशी हुज्जत घालणे असे प्रकार होत असतात. अनेकदा याचे पर्यवसान भांडणात होते. भाजे येथील धबधब्यावर भिजताना पर्यटकांच्या गटात नेहमीच वाद-भांडणे होत असतात. महिला, तरुणी यांच्या सुरक्षेचा विचार करून, तसेच स्थानिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन पर्यटनस्थळांवर बंदोबस्तासाठी पोलीस नेमावेत. कार्ला फाटा येथे शनिवारी, रविवारी वाहतूक पोलिसाची नितांत गरज आहे. या ठिकाणी चारही बाजूने वाहने येतात. बेशिस्त वाहनचालक कशाही पद्धतीने वाहने घुसवतात. त्यामुळे अपघाताचा धोका सतत जाणवत असतो. पादचाऱ्यांसाठी तर रस्ता ओलांडणे जिकिरीचे ठरते. वेहेरगाव, भाजे, कार्ला या ठिकाणी कायमस्वरूपी किंवा किमान शनिवार-रविवारी पोलीस तैनात करावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)पर्यटकांनी पाऊस आणि निसर्गाचा आनंद इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने घ्यावा. पर्यटनस्थळी मद्यपान करू नये. मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी. पर्यटन स्थळांकडे येणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी वाहनांची तपासणी करून मद्य आणि इतर अंमली पदार्थ नसल्याची खात्री करावी, अशी मागणीही होत आहे.