शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील पर्यटनस्थळांना मिळणार ‘वायफाय’ची सुविधा

By admin | Updated: May 18, 2015 04:04 IST

जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे असलेल्या ठिकाणी येत्या सहा महिन्यात भारतीय दुरसंचार निगम लिमिटेडतर्फे वायफाय सेवा उपलब्ध होणार

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे असलेल्या ठिकाणी येत्या सहा महिन्यात भारतीय दुरसंचार निगम लिमिटेडतर्फे वायफाय सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती भारतीय दूरसंचार निगम (बीएसएनएल)चे येथील महाप्रबधंक सुहास कांबळे यांनी आज पत्रकारांना दिली. प्रत्येक वर्षी १७ मे ला ‘विश्व दूरसंचार दिवस’ साजरा केला जातो. या दिवसानिमित्त बीएसएनएलच्या कार्याची माहिती देण्यासाठी कांबळे यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांच्यासमवेत उपमंडल अभियंता पी. आर. पारोलकर हेही उपस्थित होते. भारतातील प्रत्येक खेड्यापर्यंत आॅप्टिकल फायबर केबल नेटवर्क पोहचविण्यासाठी २२.८ कोटी रूपयांचा नोफान (ठऋडठ) प्रकल्प कंपनीने हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मंडणगड, रत्नागिरी, खेड आणि संगमेश्वर या चार तालुक्यांमधील ३८३ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरने जोडण्यात येणार आहेत. मंडणगडमधील ९ ग्रामपंचायतींचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर उर्वरित पाच तालुक्यांतील ग्रामपंचायतींचे काम हाती घेण्यात येईल. यासाठी निविदा प्रकिया पूर्ण झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वासही कांबळे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.खासगी सेवांच्या तुलनेने अधिक चांगल्या सुविधा देण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे कांबळे यांनी सांगितले. जिल्ह्यात १७१ टेलिफोन एक्स्जेंच आहेत तर एकूण २०० मोबाईल टॉवर कार्यरत आहेत. पाच वर्षापुर्वी खासगी कंपन्यांना भाडेतत्वावर घेतलेले टॉवर अटी पूर्ण न केल्याने पडून आहेत. असे जिल्ह्यात एकूण ३७ टॉवर्स आहेत. या टॉवर्सच्या माध्यमातून कंपनीला प्राप्त झालेल्या १५ ‘बेस्ट टर्मिनल स्टेशन’ च्या माध्यमातून सेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र येत असलेला नेटवर्कची समस्याही सुटेल, असे कांबळे यांनी सांगितले. कंपनीच्या ‘रात्री बोला मोफत’ या योजनेला १ मेपासून प्रारंभ झाला असून ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात ४०० दूरध्वनींची भर यामुळे पडली असल्याचे कांबळे यांनी सांगितले. प्रत्येक खेड्यापर्यंत मोबाईल नेटवर्क पोहचवून जनतेला संपर्क सुविधा देण्यासाठी कंपनीने कंबर कसली असल्याचे यावेळी कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)