शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

त्सुनामी आयलँडवर पर्यटकांची मांदियाळी

By admin | Updated: May 18, 2015 03:44 IST

रूपेरी वाळू आणि निळ्याशार समुद्राचा संगम पाहावयाचा असेल तर कोकणातल्या देवबागजवळील ‘त्सुनामी आयलँड’ला जायलाच हवे.

संदीप बोडवे, मालवणरूपेरी वाळू आणि निळ्याशार समुद्राचा संगम पाहावयाचा असेल तर कोकणातल्या देवबागजवळील ‘त्सुनामी आयलँड’ला जायलाच हवे. या बेटावरील वॉटर स्पोर्ट्सचा थरार पर्यटकांसाठी ‘थ्रिलिंग एक्सपिरीअन्स’ देणाराच आहे. येथील समुद्राचा तळ, खाडीतील थरार एका वेगळ्याच जगाची अनुभूती देऊन जाणारा आहे.ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हींग आणि तारकर्ली बीच ही मालवणच्या पर्यटनाची आजवरची ओळख आहे. पण या यादीत आता त्सुनामी आयलँडने अल्पावधीत स्थान मिळविले आहे. देवबागपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेले हे बेट देशी-विदेशी पर्यटकांसाठी हॉटस्पॉट ठरले आहे. आॅक्टोबर ते मे या कालावधीत त्सुनामी आयलँडवर विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स पर्यटकांसाठी उपलब्ध असतात. वॉटर स्कूटर, जेट स्की, स्पीड बोट, बनाना राईड, बंपर राईड, पॅडल बोट यांसारखे विविध प्रकार लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत विलक्षण आकर्षणाचे आहेत. आधुनिक पद्धतीचे पॅरासेलिंगही या ठिकाणी उपलब्ध आहे.