शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

कोकणसाठी पर्यटन विकास महामंडळ

By admin | Updated: April 12, 2016 03:12 IST

कोकणसाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल, तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या पर्यटन विकासासाठी ३ हजार ५५ कोटी रुपये खर्च करण्यात

मुंबई : कोकणसाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल, तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या पर्यटन विकासासाठी ३ हजार ५५ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. कोकणसाठी स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. मुंबई आणि कोकणाविषयीच्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘कोकणासाठीच्या स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळाने अधिक प्रभाावीपणे काम करावे, यासाठी मॅरेटाइम बोर्ड आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य घेतले जाईल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेचे सहकार्य घेण्यात येणार आहे. त्यासाठी ३ हजार ५५ कोटी रुपयांचा आरखडा या बँकेकडे लवकरच सादर केला जाईल.’ केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन केंद्र योजनेंतर्गत कोकणातील विजयदुर्ग, देवगड, शिराळा, सागरेश्वर, मोचेमाळसह नऊ केंद्रांचा विकास करण्यात येणार असून, त्यासाठी ८२.१७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मेक इन इंडियांतर्गत पर्यटन विकासाचे आठ सामंजस्य करार झाले असून, त्यातील सात प्रकल्प कोकणात येत आहेत. पर्यटन महामंडळांतर्गत एक संचालनालय राज्यात निर्माण केले जाणार आहे. त्या अंतर्गत पर्यटकांना सुविधांची हमी दिली जाईल. रत्नागिरी येथील विमानतळाचा विस्तार केला जाईल आणि ते व्यावसायिक तत्त्वावर चालविले जाईल. कोकणामध्ये आंब्यासह विविध फळांवर प्रक्रिया उद्योग उभारल्यास विशेष सवलती देण्यात येतील. जैन इरिगेशनच्या सहकार्याने आंबा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची घोषणा आधीच झाली आहे. या प्रकल्पासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे सहकार्य घेतले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणांतर्गत पनवेल-इंदापूर हे ८४ किलोमीटरचे काम सुरू झाले आहे. कर्नाळा अभयारण्यात येणाऱ्या २० किलोमीटरच्या पट्ट्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखविला असून, या कामाची निविदाही लवकरच काढली जाईल. इंदापूर-झाराप या ३६६ किलोमीटरपैकी १३४ किलोमीटरचे भूसंपादन पूर्ण झाले असून, त्यासाठीच्या निविदा लवकरच काढण्यात येतील आणि हे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)सी वर्ल्ड प्रकल्प आता३५० एकरमध्ये होणारसी वर्ल्ड हा कोकणातील पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरेल, असा प्रकल्प आता ३५० एकरात उभारण्यात येणार आहे. आधी १ हजार ३९० एकरात तो उभारला जाणार होता, पण त्यात भूसंपादनाच्या अनेक अडचणी होत्या. आता ३५० एकराच्या भूसंपादनासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. निवाड्याच्या प्रस्तावाला १५ दिवसांत मंजुरी दिली जाईल. ८ ते १२ महिन्यांत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पासाठी निविदा काढली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.एलिफंटा येथे पर्यटकनिवासस्थान उभारणारअरबी समुद्रात असलेल्या एलिफंटा लेण्यांच्या ठिकाणी पर्यटकांना मुक्कामी राहता यावे, यासाठी पर्यटक निवास उभारले जाईल. तेथे मिनी ट्रेन, केबल कारची सुविधा दिली जाईल. विविध वस्तूंची एकाच ठिकाणी विक्री करण्यासाठी रोजगार कुटीर उभारले जाईल. भाऊचा धक्का ते मांडवा अशी जलवाहतूक सुरू केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.