शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

झरीत माकपा व भाजपाच्या दोन गटांत तुंबळ दगडफेक

By admin | Updated: July 13, 2017 03:37 IST

कम्युनिस्ट पक्ष व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दोन गटात तुंबळ दगडफेक होऊन दोन्ही बाजू कडील १० घराचे व दुकानाचे नुकसान झाले

सुरेश काटे । लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : तालुक्यातील झरी धांगडपाडा येथे सोमवारी रात्री मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दोन गटात तुंबळ दगडफेक होऊन दोन्ही बाजू कडील १० घराचे व दुकानाचे नुकसान झाले या बाबत तलासरी पोलीस स्टेशनला दोन्ही गटाने तक्र ारी दाखल केल्या आहेत.सोमवारी दुपारी माकपाच्यावतीने झरी ग्रामपंचायतीवर आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला याच वेळी झरी मध्ये भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, झरी ग्रामपंचायत ही सध्या भाजपच्या ताब्यात आहे, मोर्चाच्या वेळी भाजपा व माकपाच्या कार्यकर्त्यांत जोरदार शाब्दिक चकमक झडली. तिचे पर्यावसन रात्रीच्या दगडफेकीत झाले यात माकपचे महेश वाज्या वळवी, रमण धांगडा, शैलेश पाचलकर, विलास पाचलकर, प्रशांत धांगडा कमलाकर धांगडा, विष्णू धांगडा, वाज्या पाचलकर यांच्या घरावर दगडफेक झाली. तसेच त्यांच्या मोटारसायकलचे नुकसान करण्यात आले. तर भाजपचे सुरेश मेढा, अरविंद भावर यांच्या घरांचे नुकसान झाले याबाबत माकपचे महेश वळवी यांनी विनोद मेढा (भाजप अध्यक्ष), प्रवीण मेढा, अरविंद भावर (सरपंच झरी) व इतर बारा तेरा जणांनी दगड व दांडक्यांनी हल्ला केल्याची तक्रार दाखल केली तर भाजपचे अरविंद सदू भावर यांनी महेश वळवी, शंकर गोवारी, सुनील धांगडा, कमलाकर धांगडा व इतर ८० ते १३० लोकांनी हल्ला केल्याची तक्रार दाखल केली बाचाबाचीची दखल पोलिसांनी घेऊन झरी येथे बंदोबस्त ठेवला असता तर रात्री चा राडा टाळता आला असता अनेक वर्षांपासून ही ग्रा.पं. माकपाच्या ताब्यात होती ती भाजपने हिरावून घेतली आहे.