शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By admin | Updated: June 13, 2016 05:10 IST

दोन अल्पवयीन मुलींना मोबाइल फोनवर गेम खेळण्याचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याची घटना ठाण्यात घडली.

ठाणे : दोन अल्पवयीन मुलींना मोबाइल फोनवर गेम खेळण्याचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याची घटना ठाण्यात घडली. या दोन्ही घटना एका परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीला शनिवारी रात्री अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.अंबिकानगर येथील पवन जाधव (२०) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. वडापाव गाडीवर काम करणाऱ्या पवन याने त्याच परिसरात राहणाऱ्या ९ वर्षीय आणि ६ वर्षीय अशा दोन अल्पवयीन मुलींना मोबाइल फोन गेम खेळण्यासाठी देतो सांगून त्याच परिसरात एका घरात नेऊन अत्याचार केला. तसेच दमदाटी करून धमकी दिली. हा प्रकार ७ जून रोजी घडला. पीडित मुलींनी घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यावर त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी पवनला अटक करून रविवारी न्यायालयात हजर केल्यावर त्याला १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस.डी. गवते पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)