शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

रुग्णवाहिकेअभावी बाळंतिणीला यातना

By admin | Updated: June 13, 2016 03:29 IST

११ जून रोजी जन्मलेल्या अर्भकाला वैद्यकीय उपचारासाठी आगरच्या उप जिल्हा रुग्णालयात हलविणे अत्यावश्यक होते.

अनिरुद्ध पाटील,

डहाणू/बोर्डी- घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवार, ११ जून रोजी जन्मलेल्या अर्भकाला वैद्यकीय उपचारासाठी आगरच्या उप जिल्हा रुग्णालयात हलविणे अत्यावश्यक होते. मात्र या रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने वाहन उपलब्ध होईपर्यंत बाळ-बाळंतींणीला असह्या यातना सोसाव्या लागल्या.घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत खुनवडे गावच्या शंकरपाडा या आदिवासी पाड्यावरील गीता सतीश दादोडा या गर्भवतीला शनिवारी प्रसूती वेदना सुरू झाल्या. या बाबत तिच्या कुटुंबीयांनी आशा कर्मचाऱ्यांस कळविले. मात्र या प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने गीताला खाजगी वाहनातून घोलवड आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. रात्री ८.२० वाजता तिची प्रसूती झाल्यानंतर नवजात अर्भक रडले नाही. आॅक्सीजनच्या कमतरतेमुळे शरीरही निळसर पडू लागल्याने बाळ-बाळंतणीला अधिक उपचारासाठी आगर येथील उप जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. परंतु रुग्णवाहिका बंद असल्याने खाजगी वाहन उपलब्ध करण्याविषयी दादोडा कुटुंबीयांना सांगण्यात आले. रात्रीची वेळ आणि परिसरात पाऊस असल्याने तासभर फिरूनही वाहन मिळाले नाही. १०८ या हेल्पलाईन क्र मांकाचीही मदत मिळाली नाही. अखेर आशागड केंद्राची रुग्णवाहिका आल्यानंतर अनेक तासांची प्रतीक्षा संपली आणि संबंधितांना हलविण्यात आले. हा कालावधी बाल-बाळंतीण, आणि वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सत्वपरीक्षेचा ठरला.>इथे सगळ्यांचीच बोंब!इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्डनुसार आदिवासी भागात ३० हजार लोकसंख्येकरिता प्राथमिक केंद्र तर, पाच हजार लोकसंख्येसाठी उपकेंद्र असणे आवश्यक आहे. त्यानुसार दोन एमबीबीएस, एक बीएएमएस, डॉक्टर, सहा खाटा, रुग्णवाहिका असणे क्र मप्राप्त आहे. या प्रा. आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिक सतत नादुरु स्त असते. रुग्णवाहिकाचालक गेल्या सुमारे चार वर्षांपासून जिल्हा परिषद सभापतींच्या वाहनावर कार्यरत आहे. त्यामुळे रुग्णवाहिकी खरोखर बंद आहे की, बंद पाडली गेली आहे असा प्रश्न जनतेला पडला आहे.